सार

केंद्र सरकारने महागाई भात्यामध्ये ३% ची वाढ केली आहे. यामुळे देशातील एक कोटी केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांचा दिवाळीचा आनंद द्विगुणित होणार आहे. हा डीए आता ५३% इतका होणार आहे.

देशातील एक कोटी केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी कंपनीने एक आनंदाची बातमी दिली आहे. केंद्र सरकारने महागाई भात्यामध्ये ३% ची वाढ केल्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. सरकारने दिवाळीच्या आधी ही बातमी देऊन केंद्रीय कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी दिली आहे. ९ ऑक्टोबर रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर निर्णय घेण्यात येईल असं सांगण्यात आलं होत पण त्यावर आता निर्णय घेतला आहे. 

महागाई भत्ता हा केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने महत्वाचा भाग असतो. एका बाजूला महागाई वाढत असताना दुसऱ्या बाजूला महागाई भत्ता वाढवण्यात यावा अशी मागणी त्यांच्याकडून दरवेळी करण्यात येत असते. हा डीए म्हणजेच महागाई भत्ता हा वर्षातून दोन वेळेला वाढवून दिला जातो. आता कर्मचाऱ्यांना हा डीए ५३% दिला जाईल असं सांगितलं आहे.