Red Fort Blast Video: दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटाने संपूर्ण देशाला हादरवून सोडले आहे. कारमध्ये झालेल्या स्फोटानंतर लागलेल्या आगीत अनेक जीव जळून खाक झाले. या स्फोटानंतर दिल्ली, मुंबई आणि इतर शहरांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Red Fort Blast News: दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ सोमवारी संध्याकाळी झालेल्या भीषण स्फोटाने संपूर्ण देश हादरला आहे. प्राथमिक माहितीनुसार, या स्फोटात अनेक जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाल्याची माहिती आहे. मात्र, या अपघातात किती जणांचा मृत्यू झाला आहे, याची अद्याप पुष्टी झालेली नाही. हा स्फोट इतका भीषण होता की, काही सेकंदातच एका कारचे आगीच्या गोळ्यात रूपांतर झाले. स्फोटानंतर आगीने रौद्र रूप धारण केले आणि आजूबाजूला उभ्या असलेल्या अनेक गाड्यांना आपल्या कवेत घेतले. या स्फोटानंतर दिल्ली, मुंबई आणि इतर शहरांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पोलिसांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत.
स्फोटाने हादरली दिल्ली
वास्तविक, हा स्फोट सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक-१ जवळ पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या कारमध्ये झाला. स्फोट होताच गोंधळ उडाला आणि पाहता पाहता आगीच्या ज्वालांनी जवळच उभ्या असलेल्या सात ते आठ गाड्यांनाही आपल्या कवेत घेतले. दिल्लीतील या स्फोटाने दिल्लीकरांना घाबरवले आहे. घटनास्थळी मोठ्या संख्येने पोलीस आणि लष्कराचे जवान दाखल झाले आहेत. सर्व सुरक्षा यंत्रणांनी तपास सुरू केला आहे. पोलिसांनी संपूर्ण परिसर सील केला आहे. कोणालाही आत जाण्याची परवानगी नाही. फॉरेन्सिक टीम घटनास्थळी हजर आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. मात्र, स्फोटाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. हा स्फोट कारमधील सीएनजीमुळे झाला की त्यात स्फोटक पदार्थ ठेवले होते, याचा तपास सुरू आहे.
दिल्लीतील स्फोटानंतरचा ६ सेकंदांचा व्हिडिओ
दिल्लीतील स्फोटानंतर समोर आलेला ६ सेकंदांचा व्हिडिओ पाहून अंगावर काटा येईल. व्हिडिओमध्ये तुम्ही स्पष्टपणे पाहू शकता की रस्त्यावर एका तरुणाचा मृतदेह पडलेला आहे. आगीच्या ज्वाला पाहून या अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला असेल याचा अंदाज लावणे कठीण आहे.


