Congress President Kharge Demands RSS Ban : सरदार वल्लभभाई पटेलांनी देशात एकता निर्माण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. इंदिरा गांधींनी बलिदान दिले. देशाचे विभाजन करू पाहणारे सरदार पटेलांच्या स्मृतीचा राजकीय फायद्यासाठी वापर करत आहेत.
Congress President Kharge Demands RSS Ban : देशात आरएसएसवर बंदी घालावी, अशी मागणी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केली आहे. देशातील सर्व समस्यांना आरएसएस आणि भाजप जबाबदार असल्याचे खरगे म्हणाले. सरदार वल्लभभाई पटेलांनी देशात एकता निर्माण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. ती एकता टिकवण्यासाठी इंदिरा गांधींनी बलिदान दिले. देशाचे विभाजन करू पाहणारे सरदार पटेलांच्या स्मृतीचा राजकीय फायद्यासाठी वापर करत आहेत.
आरएसएसवर बंदी घालण्याशिवाय दुसरा मार्ग नाही, असे सरदार पटेलांनी स्पष्ट केले होते. गांधी हत्येला आरएसएसने निर्माण केलेले वातावरण कारणीभूत होते, असे पटेल म्हणाले होते. काँग्रेस सरदारांना विसरली असे म्हणण्याचा अधिकार संघ परिवाराला नाही, असेही खरगे म्हणाले. दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत खरगेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आरोपांना उत्तर दिले.
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये इतिहास आणि सत्य लपवले जात आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना आरएसएसचे सक्रिय सदस्य होण्यावर बंदी वल्लभभाई पटेलांच्या काळात आली होती. ही बंदी मोदी सरकारने हटवली. नेहरू आणि सरदार पटेल यांच्यात घनिष्ठ संबंध होते. सरदार पटेलांच्या जयंतीदिनी मोदी राजाप्रमाणे ब्रिटिश टोपी घालून बसले होते आणि मुख्यमंत्री किंवा गृहमंत्र्यांशिवाय एकटेच बसले होते, असेही खरगे म्हणाले.


