MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • India
  • Cheapest Cashews In India : या गावात फक्त 50 रुपये किलोने मिळतोय काजू; थेट शेतकऱ्यांकडूनच खरेदी करा

Cheapest Cashews In India : या गावात फक्त 50 रुपये किलोने मिळतोय काजू; थेट शेतकऱ्यांकडूनच खरेदी करा

काजू खरेदी करायचा म्हणजे 1 किलोला 1,000 रुपये मोजावे लागतात. पण एका जिल्ह्यात काजू भाजीपाल्याच्या भावात मिळतोय. हा परिसर काजूच्या शेतीसाठी ओळखला जातो, जिथे 1 किलो काजू फक्त 50 रुपयांना मिळतोय.

2 Min read
Author : Karishma R
Published : Nov 20 2026, 05:15 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
काजू शेतीसाठी अनुकूल वातावरण
Image Credit : Asianet News

काजू शेतीसाठी अनुकूल वातावरण

झारखंडमधील संथाळ परगणा भागात असलेला जामताडा जिल्हा निसर्गसौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. येथील हवामान काजूच्या शेतीसाठी उत्तम आहे. लाल माती, मध्यम पाऊस आणि योग्य तापमान काजूच्या झाडांना वाढण्यासाठी मदत करते. पूर्वी या भागात शेताच्या कुंपणाभोवती लावलेली रोपे आता मोठी काजूची झाडे झाली आहेत. त्यामुळे आता जिल्ह्याच्या अनेक भागात काजूच्या बागा पाहायला मिळतात. स्थानिक शेतकऱ्यांसाठी काजूची शेती उत्पन्नाचा एक स्रोत बनली आहे. कधीकाळी सायबर गुन्ह्यांसाठी चर्चेत असणारा जामताडा आता काजू उत्पादनासाठी ओळखला जाऊ लागला आहे.
Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
इथे काजू इतका स्वस्त का आहे?
Image Credit : Gemini AIతో రూపొందించిన ప్రతీకాత్మక చిత్రం

इथे काजू इतका स्वस्त का आहे?

जामताडामध्ये काजू इतक्या कमी किमतीत मिळण्याचे मुख्य कारण म्हणजे शेतीचा खर्च कमी असणे. गोवा, केरळसारख्या किनारपट्टीच्या राज्यांच्या तुलनेत येथील जमिनीचे भाव कमी आहेत. तसेच, मजूर स्थानिक पातळीवर उपलब्ध असल्याने शेतीच्या कामांचा खर्चही कमी होतो. शेतकरी आपला माल विकण्यासाठी मोठ्या व्यापाऱ्यांवर पूर्णपणे अवलंबून नाहीत. स्थानिक बाजारपेठा आणि छोट्या सहकारी संस्थांमार्फत ते थेट ग्राहकांना काजू विकत आहेत. यामुळे मध्यस्थांचा वाटा कमी होतो आणि शेतकऱ्यांची थोडी बचत होते. इतर काजू उत्पादक भागांच्या तुलनेत येथील काजूच्या किमती 25 ते 30 टक्क्यांनी कमी आहेत.

Related Articles

Related image1
Cashew History : एकेकाळी गरिबांचं पीक मानला जाणारा काजू, आज इतका महागडा कसा झाला?
Related image2
Cashew Capital : भारताची काजू राजधानी कोणती माहितीये का? इथूनच जगभरात होते निर्यात
35
भाजीपाल्यासारखी रस्त्यावरच विक्री
Image Credit : Gemini AIతో రూపొందించిన ప్రతీకాత్మక చిత్రం

भाजीपाल्यासारखी रस्त्यावरच विक्री

काजू खरेदी करायचा असेल तर आपण सुपर मार्केट किंवा ड्राय फ्रूट्सच्या दुकानात जातो. पण जामताडात परिस्थिती वेगळी आहे. इथे रस्त्याच्या कडेला असलेल्या छोट्या दुकानात किंवा हातगाड्यांवर काजू विकले जातात. लोक भाजीपाला खरेदी करतात तितक्याच सहजपणे काजूही खरेदी करू शकतात. विशेष म्हणजे, स्थानिक पातळीवर पिकवलेला कच्चा काजू फक्त 50 रुपये किलोने मिळतो.
45
काजू उत्पादकांच्या समस्या
Image Credit : Gemini AIతో రూపొందించిన ప్రతీకాత్మక చిత్రం

काजू उत्पादकांच्या समस्या

जामताडात काजूचे उत्पादन वाढत असले तरी, शेतकऱ्यांना काही समस्यांचा सामना करावा लागत आहे. येथील बहुतांश शेतकरी काजूच्या फळातून काढलेला कच्चा काजू तसाच विकतात. काजू स्वच्छ करून, प्रक्रिया करून आणि पॅकिंग करण्यासाठी पुरेशा सुविधा उपलब्ध नसल्याने त्यांना जास्त नफा मिळत नाही. दुसरीकडे, साठवणुकीच्या योग्य सुविधांचा अभाव ही देखील शेतकऱ्यांसाठी एक अडचण आहे. काजू जास्त काळ साठवून ठेवण्याची सोय नसल्याने पीक हाती येताच ते कमी भावात विकावे लागते. बाजाराशी योग्य वाहतूक आणि व्यावसायिक संपर्काचा अभाव असल्याचा फटकाही शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर बसत आहे.
55
प्रक्रिया केंद्रे आल्यास शेतकऱ्यांना अधिक फायदा
Image Credit : Gemini AIతో రూపొందించిన ప్రతీకాత్మక చిత్రం

प्रक्रिया केंद्रे आल्यास शेतकऱ्यांना अधिक फायदा

जामताड्यातील काजू उद्योगाचा अधिक विकास करण्यासाठी स्थानिक पातळीवर प्रक्रिया केंद्रे स्थापन करण्याची गरज आहे. काजू स्वच्छ करणे, साले काढणे, ग्रेडिंग आणि पॅकेजिंग अशा कामांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध झाल्यास शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळेल. तसेच, कोल्ड स्टोरेज, उत्तम वाहतूक सुविधा आणि बाजार व्यवस्था विकसित केली पाहिजे. शेतकऱ्यांना आपला माल थेट मोठ्या बाजारात विकण्याची संधी दिल्यास मध्यस्थांवरील अवलंबित्व कमी होईल. सरकार आणि कृषी विभागाने योग्य प्रोत्साहन दिल्यास जामताडातील काजू उद्योग अधिक विस्तारण्याची शक्यता आहे.
India News (भारत बातम्या): Read Latest National News (नॅशनल न्यूज टुडे) in Marathi. Check trending news, current affairs today, breaking news headlines & live updates of India at Asianet Marathi News.

About the Author

KR
Karishma R
करिश्मा भुर्के, एशियानेट या वेबसाइटसाठी कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमत, महाराष्ट्र टाइम्ससह ७ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयसह, इन्फ्रास्ट्रक्चर, नागरी विकास, सामाजिक, गाव-खेड्यातील विविध विषयांवर लेखनाची आवड. जोशी-बेडेकर कॉलेजमधून बॅचलर ऑफ मास मीडियाची पदवी, तर साठे महाविद्यालयातून मास्टर्स इन जर्नालिजमचं शिक्षण पूर्ण केलं आहे.
भारताचे बातम्या

Gold & Metal Rates

Loading rates…

All cities ›
Recommended Stories
Recommended image1
Railway Tracks : रेल्वे ट्रॅक महागड्या लोखंडाचे असतात... तरीही ते का चोरीला जात नाहीत?
Recommended image2
Now Playing
Chandrashekhar Bawankule | नागपूरच्या नामांतरावर बावनकुळेंचं राऊतांना उत्तर
Recommended image3
Now Playing
Hema Malini | UP Elections | उत्तर प्रदेशात तिसऱ्यांदा योगी सरकार? हेमा मालिनींचा दावा
Recommended image4
Viral Video : क्रूझवर हजारो प्रवाशांसाठी डेझर्ट्स कसे बनतात? पाहा व्हिडिओ
Recommended image5
EV Charging : ईव्ही चार्जिंगसाठी बजेट संपलं तरी सरकार आणखी निधी देणार
Related Stories
Recommended image1
Cashew History : एकेकाळी गरिबांचं पीक मानला जाणारा काजू, आज इतका महागडा कसा झाला?
Recommended image2
Cashew Capital : भारताची काजू राजधानी कोणती माहितीये का? इथूनच जगभरात होते निर्यात
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved