Chandrashekhar Bawankule

Share this Video

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुढील तीन वर्षे राज्यभर छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान राबवण्याची घोषणा केली. भटक्या-विमुक्त समाजाला दाखले, आधार कार्ड आणि घरांच्या मालकीसंबंधी सेवा देण्यासाठी ६ ते ८ जानेवारीदरम्यान शिबिरे होणार आहेत. फासेपारधी समाजासाठी गावठाण, शिक्षण आणि रोजगाराच्या योजनांचीही माहिती दिली. सातारा जिल्हा बँकेतील वादाचा महायुतीवर परिणाम होणार नसल्याचे त्यांनी सांगितले. नागपूरच्या नामांतराच्या मागणीवर संजय राऊतांना उत्तर दिले. हापूस आंब्याच्या GI टॅगबाबत न्यायालयाचा निर्णय असल्याचे स्पष्ट केले. इंदू मिल स्मारकाचा वाढीव खर्च सरकार उचलणार असल्याची ग्वाही दिली. नागपूर रिंग रोडसाठी शेतकऱ्यांशी चर्चा करणार असल्याचे सांगितले. पंतप्रधान मोदींवरील टीकेवरून राहुल गांधींना पंतप्रधानपदाची स्वप्ने पडत असल्याचा टोलाही लगावला.

Related Video