मुंबई इंडियन्सच्या पराभवावर कर्णधार हार्दिक पांड्याने केले भाष्य, अखेर सांगितले असे सत्य की...

| Published : May 12 2024, 08:43 AM IST

Hardik Pandya

सार

मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने पराभवाबद्दलचे मौन सोडले असून कोलकत्ता नाईट रायडर्सविरोधात कशी हार झाली याचे स्पष्टीकरण दिले आहे. 

मुंबई इंडियन्स संघाची कामगिरी यावर्षीच्या आयपीएलमध्ये खराब झाली आहे. कर्णधार रोहित शर्माला बदलून हार्दिक पांड्याला केल्यानंतर या संघाची कामगिरीच अशी झाल्याचं बोललं जात आहे. तरीही याबाबत बोलण्याचं धाडस मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार हार्दिक पांड्याने दाखवलं आहे. त्यांचा कोलकत्ता नाईट रायडर्ससोबत झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाला हार पत्करावी लागली आहे. त्यामुळे हार्दिक पांड्याने मीडियाचा सामना केला. 

काय म्हटला हार्दिक पांड्या - 
मीडियाशी बोलताना त्याने सांगितले की, पराभव पचवणे खरंच खूप कठीण काम आहे. हार्दिक म्हणतो की आम्ही सुरुवात चांगली केली होती पण त्यामध्ये आम्हाला सातत्य राखता आले नाही. या सुरुवातीचे रूपांतर विजयात करता आले नाही. धावांची गती राखता न आल्यामुळे विकेट खाली वर होत होत्या. गोल्डअंजनी बॉल ओला असताना चांगली कामगिरी केल्याचा उल्लेख यावेळी हार्दिकने केला आहे. 

आम्हाला फक्त खेळाचा आनंद घ्यायचा आहे - 
हार्दिक पांड्याने यावेळी बोलताना आम्हाला फक्त क्रिकेटचा आनंद घ्यायचा आहे असं सांगितले. या पर्वात आम्ही साजेशी कामगिरी करू शकलो नाही असेही यावेळी बोलताना मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने सांगितले आहे. या सामन्यामध्ये मुंबई इंडियन्स संघाचा 18 धावांनी पराभव झाला असून हा सर्वच खेळाडूंच्या जिव्हारी लागणारा पराभव ठरला आहे. 

मुंबई इंडियन्स संघाची प्लेयिंग 11- 
इशान किशन (विकेटकीपर), नमन धीर, सूर्यकुमार यादव, टिळक वर्मा, नेहल वढेरा, हार्दिक पांड्या (कर्णधार), टिम डेव्हिड, अंशुल कंबोज, पीयूष चावला, जसप्रीत बुमराह, नुवान तुषारा.
आणखी वाचा - 
अरविंद केजरीवाल आणि आप पक्षावर बजरंगबलीची कृपा, नाहीतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पक्ष संपवून टाकतील
टिप्परने धडक दिल्याने छोटा हत्तीमधून नोटांचे बंडल पडले रस्त्यावर, पोलिसांनी 7 कोटी केले जप्त