सार

Gautam Adani Salary : अदानी समूहाचे चेअरमन गौतम अदानी यांना 9.26 कोटींचे वार्षिक पॅकेज मिळाले आहे. पण त्यांच्या कर्मचाऱ्यांचे वेतन त्यांच्यापेक्षा अधिक आहे. कोणाची आहे जास्त कमाई?

Gautam Adani Salary : अदानी समूहाचे चेअरमन आणि देशातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी यांना किती वेतन असेल हा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. त्यांच्या पगाराविषयीची माहिती समोर आली आहे. गौतम अदानी यांना आर्थिक वर्ष 2024 साठी 9.26 कोटी रुपयांचे पॅकेज मिळाले आहे. त्यांना मिळणारे वेतन हे त्यांच्या समकक्ष इतरांपेक्षा कमी आहे. इतकेच नाही तर त्यांच्या कर्मचाऱ्यांपेक्षा पण त्यांचा पगार कमी आहे. एका माहितीनुसार, अदानी समूहातील 10 पैकी केवळ 2 कंपन्यांकडून पगार घेतात.

दोन कंपन्यांकडून वेतन

अदानी समूहाच्या शेअर बाजारात 10 कंपन्या सूचीबद्ध आहेत. या कंपन्यांच्या वार्षिक अहवालानुसार त्यांना अदानी इंटरप्राईजेस लिमिटेडकडून आर्थिक वर्ष 2023-24 साठी 2.19 कोटी रुपयांचा पगार मिळाला. तर भत्त्यांपोटी 27 लाख रुपये मिळाले. त्यांना अदानी इंटरप्रायजेसकडून एकूण 2.46 कोटी रुपेय मिळाले. गेल्या वर्षीपेक्षा ही रक्कम 3 टक्क्यांपेक्षा अधिक आहे. याशिवाय अदानी पोर्ट्स अँड एसईझेड लिमिटेड कडून त्यांना 6.8 कोटी रुपये मिळाले आहेत.

या कर्मचाऱ्यांचे वेतन त्यांच्यापेक्षा अधिक

ब्लूमबर्ग बिलिनिअर इंडेक्सनुसार गौतम अदानी यांची नेटवर्थ 106 अब्ज डॉलर इतकी आहे. मुकेश अंबानी हे जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत 12 व्या तर गौतम अदानी हे या यादीत 14 व्या क्रमांकावर आहेत. गौतम अदानी यांचा लहान भाऊ राजेश अदानी हा 8.37 कोटी रुपये तर भाचा प्रणव अदानी हा 6.46 कोटी रुपये पगार घेतो.

त्यांचा मुलगा करण अदानी याला 3.9 कोटी रुपयांचे पॅकेज आहे. तर अदानी इंटरप्राईजेसचे विनय प्रकाश यांचा पगार 89.37 कोटी रुपये आहे. समूहाचे सीएफओ जुगेशिंदर सिंह यांना 9.45 कोटी रुपये तर अदानी ग्रीन एनर्जीचे सीईओ विनीत जैन यांना 15.25 कोटी रुपयांचा पगार मिळतो. त्यांचे वेतन गौतम अदानी यांच्यापेक्षा अधिक आहे.

आणखी वाचा :

Hat-trick for Pushpak: इस्रोच्या 'पुष्पक' चे अप्रतिम काम, पुन्हा वापरता येण्याजोगे प्रक्षेपण यानाचे तिसऱ्यांदा अवकाशात यशस्वी लँडिंग