सार
बुधवारी सकाळी दिल्ली आणि एनसीआरच्या अनेक शाळांमध्ये बॉम्ब असल्याचा कॉल पोलिसांना आला.त्यानुसार पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. तसेच सर्वत्र सर्च ऑपेरेशनला सुरुवात केली आहे. यावेळी अनेक शाळेतील परिसर देखील रिकामा करण्यात आला होता
दिल्ली-एनसीआरमधील अनेक शाळांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी ई मेल द्वारे देण्यात आली. दिल्ली पब्लिक स्कूल द्वारका, संस्कृती स्कूल, मदर मेरी स्कूल, दिल्ली पब्लिक स्कूल नॉयडा आणि दिल्ली पब्लिक स्कूल आरके पुरम यांना धमकीचे ईमेल आले असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.धमकीचे ई मेल पाहताच पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यानुसार पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून संपूर्ण परिसराची तपासणी करत आहेत.
संस्कृती ही दिल्लीतील सर्वात उच्च भ्रू शाळांपैकी एक आहे. बॉम्ब असल्याची माहिती मिळाल्यानंतर शाळेचा परिसर रिकामा करण्यात आला.याशिवाय दिल्ली पब्लिक स्कूल द्वारका येथे बॉम्बचा ईमेलही प्राप्त झाला आहे. डीसीपी द्वारका अंकित सिंह यांनी सांगितले की, तपास सुरू आहे. पोलिसांचे पथक शोध घेत आहे. हा मेल रात्री शाळेत आला.केवळ या तीन शाळाच नाही तर दिल्ली एनसीआरच्या इतर 5 शाळांमध्येही बॉम्बच्या धमकीचे असेच ईमेल आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मदर मेरी स्कूलमध्ये मुलांची परीक्षा सुरू होती, मात्र बॉम्ब असल्याची माहिती मिळाल्यानंतर परीक्षा थांबवण्यात आली. मुलांच्या सुरक्षेच्या कारणास्तव शाळेतील संपूर्ण मुलांना घरी पाठवण्यात आले आहे.
पोलिसांची कसून तपासणी :
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांनी सांगितले आहे की, अनेक शाळांना असे मेल मिळाले आहेत ज्यात शाळेच्या परिसरात बॉम्ब असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, आजतागायत एकाही शाळेत संशयास्पद काहीही आढळून आलेले नसून पोलीस सर्व ठिकाणी तपास करत आहेत.
या शाळांना धमकीचा ईमेल :
दिल्ली पब्लिक स्कूल (द्वारका), संस्कृती स्कूल, मदर मेरी स्कूल, दिल्ली पब्लिक स्कूल नॉयडा आणि दिल्ली पब्लिक स्कूल (आरके पुरम) यांसह इतर ३ शाळांना मेल आला आहे.
आणखी वाचा :
राघव चड्डा लंडनला गेले नसते तर दृष्टीहीन झाले असते, दिल्लीचे मंत्री सौरभ भारद्वाज यांनी दिली माहिती