Boeing 787 Dreamliner Accident : अहमदाबाद येथे एअर इंडियाच्या विमानाचा अपघात झाल्याची दुर्घटना 12 जूनला घडली. यामध्ये विश्वासकुमार रमेश हे एकमेव प्रवासी बचावले आहेत.
Boeing 787 Dreamliner Accident : अहमदाबाद विमानतळाजवळ एक भीषण अपघात घडला आहे. लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या Boeing 787 Dreamliner विमानाचा अपघात झाला असून या दुर्घटनेत फक्त एक प्रवासी वाचल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. विश्वासकुमार रमेश असे या एकमेव बचावलेल्या व्यक्तीचे नाव असून, ते ‘11A’ या सीटवर बसलेले होते.
या विमानात एकूण २३० प्रवासी आणि १२ क्रू सदस्य होते. विश्वासकुमार आपल्या भावासह लंडनला प्रवास करत होते. अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटलच्या ट्रॉमा वॉर्डचे डॉक्टर डॉ. श्रीक एम. यांनी सांगितले की, रमेश यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
‘11A’ सीट ठरली संकटमोचक!
Boeing 787 Dreamliner मध्ये ‘11A’ ही सीट इकॉनॉमी क्लासमधील सुरुवातीच्या रांगेत, डाव्या बाजूच्या खिडकीजवळ असते. अनेक वेळा या जागा आपत्कालीन दरवाजाजवळ असतात आणि त्या विशेष जागा म्हणून ओळखल्या जातात. यातून घटनेनंतर तातडीने बाहेर पडण्याचा मार्ग सहज उपलब्ध होतो.
दरवाज्याजवळच्या या जागेमुळेच विश्वासकुमार रमेश यांना बाहेर पडण्यासाठी मदत झाली, असं मानलं जात आहे.विमानाचा पुढील भाग अपघातात जास्त नष्ट झाला असतानाही ही सीट सुरक्षित राहिली, ही बाब अधिकच आश्चर्यकारक ठरते.
अपघातातील एकमेव बचावलेला प्रवासी
गॅटविक विमानतळावरून उड्डाण केलेल्या या विमानात १६९ भारतीय, ५३ ब्रिटन नागरिक, ७ पोर्तुगीज आणि १ कॅनेडियन नागरिक होते. उड्डाणानंतर केवळ एका मिनिटातच डॉक्टरांच्या हॉस्टेलवर हे विमान कोसळले.अपघात इतका भीषण होता की फक्त **एकाच प्रवाशाचा जीव वाचवता आला.
‘मे डे’ कॉलनंतर काही क्षणांतच अपघात
एअर ट्रॅफिक कंट्रोलने सांगितले की, दुपारी १.३९ वाजता उड्डाण होताच पायलटने ‘मे डे’ डिस्ट्रेस कॉल जारी केला होता.याचा अर्थ विमानात तांत्रिक बिघाड झाला होता आणि संकट घोंगावत होतं. काही क्षणांतच विमान कोसळल्याने बचावाची फारशी संधीच मिळाली नाही.
ड्रीमलाइनरचा पहिलाच भीषण अपघात
Boeing 787 Dreamliner या मॉडेलसाठी हा पहिलाच इतका मोठा अपघात ठरला आहे. ड्रीमलाइनरला प्रगत इंजिन, हलकी रचना आणि इंधन कार्यक्षमतेसाठी ओळखलं जातं. मात्र या अपघातानं अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.


