सार

Computer Classes Programme : boAt या भारतातील आघाडीच्या ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स ब्रँडने सरकारी शाळेतील मुलांसाठी संगणक वर्ग कार्यक्रम सुरू करण्यासाठी नम्मा बंगळुरू फाउंडेशन (NBF) सोबत भागीदारी केली आहे.

Computer Classes Programme : समाजातील काही घटकांमधील व डिजिटल युगातील अंतर दूर करण्यासाठी आणि भावी पिढी अधिक सशक्त घडवण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण वाटचाल करत ‘boAt’या भारतातील आघाडीच्या ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स ब्रँडने सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी संगणक वर्ग कार्यक्रम सुरू करण्यासाठी ‘नम्मा बंगळुरू फाउंडेशन’ (NBF) सोबत भागीदारी केली आहे. या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) उपक्रमाचा उद्देश डिजिटल युगापासून दूर असणाऱ्या विद्यार्थ्यांना आवश्यक सोयीसुविधा पुरवणे हा आहे. उदाहरणार्थ कम्प्युटर, नवीन संधींचे मार्ग उपलब्ध करणे आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यापर्यंतचे कार्य करणे.

डिजिटल युग आणि भावी पिढी

डिजिटल युगामध्ये भरभराट होण्यासाठी आवश्यक असलेल्या साधनांसह भावी पिढीला सक्षम करण्यासाठी डिझाइन केलेला हा कार्यक्रम प्रशिक्षण आणि मूलभूत संगणक कौशल्यांची व्यापक माहिती प्रदान करेल. या कार्यक्रमांतर्गत विद्यार्थी मूलभूत संगणक ऑपरेशन्स, डिजिटल साक्षरता आणि सॉफ्टवेअर अ‍ॅप्लिकेशन्स यासारख्या आवश्यक विषयांचा अभ्यास करतील आणि सतत विकसित होत असलेल्या डिजिटल लँडस्केपमध्ये उत्तमरित्या स्वतःला घडवण्यासाठी आत्मविश्वास आणि ज्ञान संपादित करतील.

boAtचा महत्त्वपूर्ण कार्यक्रम

boAt चे सह-संस्थापक आणि CEO समीर मेहता म्हणाले, "जीवन सक्षम घडवणे तसेच जीवनामध्ये परिवर्तन घडवून आणण्याच्या तंत्रज्ञानाच्या सामर्थ्यावर आमचा (boAt) विश्वास आहे. नम्मा बेंगळुरू फाउंडेशनसोबतच्या या सहकार्याद्वारे विद्यार्थी व डिजिटल युगातील अंतर कमी करण्यासाठी तसेच या विद्यार्थ्यांमधील क्षमता जाणून घेऊन त्यांना आवश्यक संगणक कौशल्य उपलब्ध करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. हा कार्यक्रम केवळ विद्यार्थ्यांचा शिक्षणाचाच अनुभव वाढवणार असेलच याव्यतिरिक्त वैयक्तिक आणि व्यावसायिक वाढीसाठी नवीन मार्ग देखील उपलब्ध होतील, असा आम्हाला विश्वास आहे.

याबाबत नम्मा बंगळुरू फाउंडेशनचे विश्वस्त संजय के प्रभू यांनी म्हटले आहे की, "या प्रभावी उपक्रमामध्ये boAtसोबत भागीदारी करताना आम्हाला आनंद होत आहे. संगणक वर्ग कार्यक्रम येथील विद्यार्थी व डिजिटल युगातील अंतर कमी करणे आणि सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांना सक्षम बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल. आम्हाला विश्वास आहे की तंत्रज्ञान आणि ज्ञानाची उपलब्धता हे एक समान क्षेत्र तयार करण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे व हा कार्यक्रम सर्वसमावेशक शिक्षण तसेच भावी पिढीला सशक्त घडवण्याच्या आमच्या वचनबद्धतेला मूर्त रूप देणारा आहे."

निवडक सरकारी शाळांमध्ये राबवण्यात येणार कार्यक्रम 

बंगळुरूमधील निवडक सरकारी शाळांमध्ये संगणक वर्ग कार्यक्रम राबवण्यात येईल तसेच वेगवेगळी पार्श्वभूमी असणाऱ्या विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ घेता येईल. या विद्यार्थ्यांकरिता मौल्यवान डिजिटल कौशल्य उपलब्ध करून त्यांच्या केवळ शैक्षणिक कामगिरीमध्येच तर त्यांना उच्च शिक्षण तसेच भविष्यातील करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी योग्य पद्धतीने घडवणे, हे ‘boAt’ आणि ‘NBF’चे उद्दिष्ट आहे.

boAt आणि नम्मा बंगळुरू फाउंडेशन एकत्रितपणे विद्यार्थी व डिजिटल युगातील अंतर दूर करण्यासाठी आणि भावी पिढीला सक्षम बनवण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत आहेत. सरकारी शाळेतील मुलांसाठी संगणक वर्ग कार्यक्रमाद्वारे भावी पिढीला डिजिटल लँडस्केप उत्तमरित्या जाणून घेण्यासाठी आणि विद्यार्थ्यांमधील क्षमतेची योग्य ठिकाणी गुंतवणूक व्हावी यासाठी आवश्यक असलेली साधने त्यांना उपलब्ध करण्याचे कार्य करत आहे.

आणखी वाचा

सरकारने SIMIवर 5 वर्षांची बंदी घातली, केंद्रीय गृह मंत्रालयाने जारी केला आदेश

Green Hydrogen Project : हरित हायड्रोजन निर्मितीसाठी 7 कंपन्यांसोबत सामंजस्य करार, 64 हजार रोजगार निर्मिती होणार - CM एकनाथ शिंदे

Shiv Sena MLA Anil Babar : शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांचे निधन, उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास