BMW इंडिया १ सप्टेंबर २०२५ पासून कारच्या किमती ३ टक्क्यांनी वाढवणार
गुरुग्राम - BMW इंडियाने जाहीर केले आहे की १ सप्टेंबर २०२५ पासून त्यांच्या सर्व मॉडेल्सच्या किमतींमध्ये ३% पर्यंत वाढ होणार आहे. त्यामुळे ग्राहकांना आता या कार घेण्यासाठी जास्त किंमत मोजावी लागणार आहे.

विक्रम पवाह यांनी सांगितले
BMW ग्रुप इंडियाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रम पवाह यांनी सांगितले, “या वर्षाच्या पहिल्या सहामाहीत BMW इंडियाची वाढ आणि विक्रीची गती उल्लेखनीय राहिली आहे. मात्र, परकीय चलनातील बदल, जागतिक पुरवठा साखळीतील अडचणी, तसेच साहित्य व लॉजिस्टिक खर्च वाढल्याने किमती वाढवणे आवश्यक झाले आहे. ग्राहकांना त्यांच्या संपूर्ण प्रवासात सर्वोत्तम मूल्य आणि अनुभव देण्याच्या आमच्या बांधिलकीत कोणताही बदल नाही. सणासुदीच्या हंगामात आम्ही आमच्या गाड्यांच्या अनेक दमदार आणि नवीन व्हेरिएंट्स आणणार आहोत. BMW च्या आलिशान आणि नाविन्यपूर्ण गाड्यांची मागणी वाढत असल्यामुळे आम्ही उत्कृष्ट कामगिरी आणि इनोव्हेशनसह ग्राहकांना आनंद देत राहू.”
या कारच्या समावेश
स्थानिक पातळीवर तयार होणाऱ्या BMW गाड्यांमध्ये BMW 2 सीरीज ग्रॅन कूप, BMW 3 सीरीज लाँग व्हीलबेस, BMW 5 सीरीज लाँग व्हीलबेस, BMW 7 सीरीज, BMW X1, BMW X3, BMW X5, BMW X7, BMW M340i आणि BMW iX1 लाँग व्हीलबेस यांचा समावेश आहे.
या कार आहेत उपलब्ध
याशिवाय BMW i4, BMW i5, BMW i7, BMW i7 M70, BMW iX, BMW Z4 M40i, BMW M2 कूप, BMW M4 कॉम्पिटिशन, BMW M4 CS, BMW M5, BMW M8 कॉम्पिटिशन कूप आणि BMW XM (प्लग-इन हायब्रिड) या गाड्या पूर्णपणे तयार (CBU) स्वरूपात उपलब्ध आहेत.
फायनान्स सुविधी पुरविली जाते
BMW इंडिया फायनान्शियल सर्व्हिसेसमुळे ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार आर्थिक योजना घेता येतात. BMW स्मार्ट फायनान्स अंतर्गत आकर्षक मासिक हप्ता, काही निवडक मॉडेल्ससाठी कमी व्याजदर, हमीदार बाय-बॅक पर्याय आणि टर्म संपल्यानंतर लवचिक पर्याय यांसारखे अनेक फायदे दिले जातात.
