भाजप नेते राहुल वाल्मिकी यांचा एका विवाहित महिलेसोबत आक्षेपार्ह अवस्थेत असलेला व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यावरुन बराच गदारोळ झाला आहे. काही महिन्यांपूर्वीही एका भाजप नेत्याचा असाच व्हिडिओ समोर आला होता.

लखनौ : उत्तर प्रदेशमधून एक लज्जास्पद व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एका स्थानिक भाजप नेत्याला एका विवाहित महिलेसोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहता येत आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील बुलंदशहरच्या शिकारपूर कोतवाली क्षेत्रातील कैलवन गावातील असल्याचे एबीपी न्यूजने वृत्त दिले आहे. भाजप नेत्याचे नाव राहुल वाल्मिकी असल्याचे सांगण्यात आले आहे.

जुलै ११ रोजी शुक्रवारी संध्याकाळी ही घटना घडली असून, आज भाजपच्या अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हा सचिव राहुल वाल्मिकी हे लोकांची माफी मागत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. आपले अंतर्वस्त्र नीट करताना गाडीतून बाहेर पडणारा व्यक्ती, तिथून लोकांचे पाय धरून नमस्कार करण्यासाठी पुढे येत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. तो व्यक्ती पाया पडून माफी मागतो. माफी मागत असलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

नेमके काय घडले? भाजप नेते राहुल वाल्मिकी कसे सापडले?

कैलवन गावाच्या बाहेर स्मशानाजवळ एक संशयास्पद कार उभी होती. कार पाहून ग्रामस्थांना तिथे काहीतरी सुरू असल्याचे वाटले आणि ते पाहण्यासाठी गेले. त्यावेळी राहुल वाल्मिकी एका महिलेसोबत आक्षेपार्ह अवस्थेत असल्याचे पाहून त्यांनी व्हिडिओ बनवला. लोकांना पाहून घाबरलेले राहुल वाल्मिकी घाईघाईने कपडे घालून बाहेर पडले आणि व्हिडिओ बनवू नका अशी विनंती केली.

राहुल वाल्मिकी यांच्या वडिलांची प्रतिक्रिया

या घटनेवर राहुल वाल्मिकी यांच्या वडिलांनी प्रतिक्रिया दिली आहे. व्हायरल झालेला व्हिडिओ ५-६ महिन्यांपूर्वीचा असून, हे राजकीय कटकारस्थान असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. बुलंदशहरचे एसपी (ग्रामीण) डॉ. तेजवीर सिंग म्हणाले की, व्हायरल व्हिडिओ आमच्या निदर्शनास आला आहे. या प्रकरणी चौकशी सुरू आहे, मात्र अद्याप कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही. व्हिडिओमधील व्यक्ती राहुल वाल्मिकीच आहेत हे ओळखण्यात पोलिसांना अपयश आले आहे.

Scroll to load tweet…

मध्य प्रदेशातही व्हिडिओ व्हायरल

याच वर्षी मध्य प्रदेशातील शिवनी मालव्यातील ज्येष्ठ भाजप नेते कमल रघुवंशी यांचा असल्याचा म्हटला जाणारा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. एप्रिल २९ रोजी झालेल्या एका लग्नात कमल रघुवंशी यांनी एका नर्तकीसोबत अश्लील डान्स केला होता. लग्नात उपस्थित असलेल्या लोकांनी कमल रघुवंशी यांचे हे वर्तन मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून सोशल मीडियावर शेअर केले होते.

या लग्न समारंभात स्थानिक राजकीय नेते, भाजपच्या महिला नेत्याही उपस्थित होत्या, ज्यामुळे हा प्रकार चर्चेचा विषय ठरला होता. आपल्या पक्षातील नेते कमल रघुवंशी यांच्या वर्तनाचा तिथे उपस्थित असलेल्या कोणत्याही महिला नेत्याने निषेध केला नाही हे विशेष. नर्तकीला मिठी मारणाऱ्या कमल रघुवंशी यांनी तिला किसही केले होते.

Scroll to load tweet…

काँग्रेसचा हल्ला

या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनाटे म्हणाल्या की, भाजप नेत्यांच्या अश्लिल कृत्यांमुळे देश स्तब्ध झाला आहे. आधी उत्तर प्रदेशातील बबन सिंग रघुवंशी, नंतर खासदार मनोहरलाल धाकड, आता नर्मदापूरमचे कमल रघुवंशी. आपल्या मुलींचे रक्षण करणारे पुरुष हेच आहेत का, असा प्रश्न सुप्रिया यांनी विचारत संताप व्यक्त केला.