सार

भारतीय जनता पक्षाने याआधी दोन यादी जाहीर केल्या असून यातून काही प्रमाणात उमेदवारांचे चित्र स्पष्ट झाले आहे. आज भाजपाने तिसरी यादी जाहीर केली असून यात केवळ नऊ उमेदवारांचा समावेश आहे.

चेन्नई : भारतीय जनता पक्षाने आज लोकसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत तामिळनाडू राज्यातील नऊ उमेदवारांचा समावेश असून भाजपचे मुख्य अन्नामलाई यांना कोईम्बतूर मधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

तसेच माजी केंद्रीय मंत्री पोन राधाकृष्णन यांना कन्याकुमारीमधून तिकीट मिळाले आहे. तेलंगणाच्या माजी राज्यपाल तमिलिसाई सुंदरराजन यांना चेन्नई दक्षिणमधून तिकीट देण्यात आले आहे. तर विनोद पी सेल्वम हे चेन्नई सेंट्रलमधून, डॉ. ए. सी. षणमुगम यांना वेल्लोरमधून, सी नरसिंहन कृष्णगिरीतून, एल मुरुगन निलगिरी मतदार संघातून, टीआर पारिवेंधर पेरांबलूर मधून आणि नैनर नागेंद्रन थुथुक्कुडीमधून निवडणूक लढवत आहेत.

या विषयाची अधिक माहिती थोड्याच वेळात अपडेट करत आहोत.