MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • India
  • Bihar Next CM : बिहारचे पुढचे मुख्यमंत्री कोण? एका फोटोत दडलंय सगळं 'राज'कारण!

Bihar Next CM : बिहारचे पुढचे मुख्यमंत्री कोण? एका फोटोत दडलंय सगळं 'राज'कारण!

Bihar Next CM : नितीश कुमार यांच्यानंतर बिहारचे पुढचे मुख्यमंत्री कोण होणार? या एका फोटोमुळे चर्चांना उधाण आलंय. कारण यात अमित शाह, नितीश कुमार, भाजप अध्यक्ष नितीन नवीन आणि मुख्यमंत्रिपदाचे प्रबळ दावेदार सम्राट सिंह चौधरी एकत्र दिसत आहेत.

2 Min read
Author : Asianetnews Team Marathi
Published : Mar 08 2026, 10:30 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
14
Image Credit : ANI
बिहारमध्ये राजकीय बदलांचे वारे वाहत आहेत. नितीश कुमार यांनी राज्यसभेसाठी अर्ज भरल्यापासून पाटणा ते दिल्लीपर्यंत एकच चर्चा आहे - बिहारचा पुढचा मुख्यमंत्री कोण? मुख्यमंत्री भाजपचाच असेल हे जवळपास निश्चित आहे. अनेक नावं चर्चेत असली तरी, या फोटोमुळे सगळं ठरल्याचं बोललं जातंय. कारण यात निर्णय घेणारे अमित शाह, भाजप अध्यक्ष नितीन नवीन, स्वतः नितीश कुमार आणि मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आघाडीवर असलेले सम्राट सिंह चौधरी दिसत आहेत. त्यामुळे या बैठकीत नाव निश्चित झालं असण्याची दाट शक्यता आहे.
Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
24
Image Credit : ANI
बिहारच्या राजकारणातील जाणकारांच्या मते, जर कुर्मी समाजाचे मुख्यमंत्री (नितीश कुमार) पायउतार होत असतील, तर जातीय समीकरणानुसार कोईरी समाजाचा नेता मुख्यमंत्री होऊ शकतो. कारण बिहारमध्ये कुर्मी आणि कोईरी यांना 'लव-कुश' समीकरण मानलं जातं. या दोन जातींपैकीच मुख्यमंत्री झाल्यास सत्तेचा समतोल साधला जाईल. त्यामुळेच सम्राट चौधरी सध्या मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहेत.

Related Articles

Related image1
Sanju Samson: वर्ल्ड कप फायनलमध्ये संजूचा धमाका, सलग तिसऱ्यांदा फिफ्टी ठोकत रचला नवा विक्रम!
Related image2
Women's Day Celebration: ऑफिसमध्ये महिला दिन साजरा करायचाय? या ५ भन्नाट आयडियाज नक्की ट्राय करा!
34
Image Credit : google
बिहारमध्ये कुणीतरी नवीन चेहराही मुख्यमंत्री होऊ शकतो, अशीही चर्चा मीडियामध्ये आहे. कारण भाजप अशा बाबतीत नेहमीच धक्कातंत्राचा वापर करते. राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि अगदी ओडिशामध्येही भाजपने अनपेक्षित चेहरे दिले. त्यामुळे पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांची जोडी पुन्हा एकदा धक्कादायक निर्णय घेऊ शकते, म्हणून कोणताही अंदाज बांधणं घाईचं ठरेल.
44
Image Credit : ANI
सम्राट सिंह चौधरींनंतर दुसरं नाव केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांचं आहे. ते यादव समाजातून येतात आणि गृहमंत्री अमित शाह यांचे निकटवर्तीय मानले जातात. बिहारमध्ये यादव समाजाचा मुख्यमंत्री देऊन भाजप पुढच्या वर्षी सर्वात मोठ्या राज्यात, म्हणजेच उत्तर प्रदेशमध्ये यादव मतदारांना आकर्षित करू शकते. त्यामुळे भाजप त्यांच्या नावावरही डाव खेळू शकते, असं म्हटलं जातंय.

About the Author

AT
Asianetnews Team Marathi
भारताचे बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Gold-Silver Import Duty : इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारचा मोठा निर्णय! सोने-चांदी आयात शुल्क थेट १५% वर
Recommended image2
Now Playing
ओवैसींवर शिर्साटांचा हल्लाबोल, निदा खान प्रकरणावर मोठं वक्तव्य | Sanjay Shirsat | Owaisi | TCS Case
Recommended image3
Now Playing
आर्थिक संकटावर आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल, सरकारवर गंभीर आरोप | Aaditya Thackeray | Modi | Maharashtra
Recommended image4
NEET Paper Leak: अखेर मास्टरमाइंडला अटक, राजस्थानमधून असं उघड झालं संपूर्ण रॅकेट
Recommended image5
Now Playing
लाडकी बहीण योजनेत 69 लाख महिलांवर कारवाई? मोठा राजकीय वाद | Ladki Bahin | Maharashtra | Politics
Related Stories
Recommended image1
Sanju Samson: वर्ल्ड कप फायनलमध्ये संजूचा धमाका, सलग तिसऱ्यांदा फिफ्टी ठोकत रचला नवा विक्रम!
Recommended image2
Women's Day Celebration: ऑफिसमध्ये महिला दिन साजरा करायचाय? या ५ भन्नाट आयडियाज नक्की ट्राय करा!
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved