
Eknath Shinde
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या अमित शहांवरील टीकेला प्रत्युत्तर देत २०१९ मध्ये शिवसेना-भाजप युतीचा विश्वासघात केल्याचा आरोप केला. मोदी आणि अमित शहांवर टीका करून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे ते म्हणाले. रोहित पवारांच्या आरोपांवरही त्यांनी उत्तर देत केवळ एखाद्यासोबत फोटो असल्याने त्याला पाठिंबा दिल्याचे सिद्ध होत नाही, असे सांगितले. विरोधकांनी राजकारण सोडून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करावी, असे आवाहन केले.