यावेळी त्यांनी स्वतः हातात झाडू घेऊन शहर स्वच्छ केले. यावेळी त्यांच्यासोबत सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते, एनसीसीचे कॅडेट्सही होते. डाबी यांच्या सोबत महापालिका आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते.
बाडमेर - बाडमेर शहरात ‘नवो बाडमेर’ मोहिमेअंतर्गत स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यासाठी जिल्हाधिकारी आणि युपीएससी टॉपर टीना डाबी (Tina Dabi) यांनी आज शनिवारी सकाळपासून रस्त्यावर उतरून स्वच्छतेचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी स्वतः हातात झाडू घेऊन शहर स्वच्छ केले. यावेळी त्यांच्यासोबत सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते, एनसीसीचे कॅडेट्सही होते. डाबी यांच्या सोबत महापालिका आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते.
या पाहणीदरम्यान त्यांनी रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या दुकानदारांना दुकानासमोर कचरा टाकू नये, तसेच कचऱ्याची व्यवस्था स्वतः करावी, अशा कडक सूचना दिल्या. प्रत्येक दुकानासमोर कचरा डबा ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
टीना डाबी यांनी थेट सूचना देताना सांगितले की, "शहराची स्वच्छता ही फक्त महापालिकेची जबाबदारी नाही, तर सर्व नागरिकांची सामूहिक जबाबदारी आहे." यावेळी काही दुकानदार स्वतः झाडू घेऊन रस्ते स्वच्छ करतानाही दिसले.
त्याचप्रमाणे, शहरात उभ्या असलेल्या थिपकाऱ्या हातगाड्यांच्या मालकांनाही तीव्र शब्दांत इशारा देण्यात आला की, "जर दुकानासमोर कचरा टाकला तर त्या गाड्या हटवण्यात येतील." हे म्हणत त्यांनी गैरजबाबदार दुकानदारांवर कारवाईचा इशाराही दिला.
‘नवो बाडमेर’ मोहिमेअंतर्गत शहरातील स्वच्छतेची सुधारणा करण्यासाठी दररोज नियमित पाहणी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. तसेच, शहरातील प्रत्येक वार्डात स्वच्छतेची पातळी उंचावण्यासाठी लोकसहभागातून विशेष अभियान राबवले जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्राची सुनबाई
टीना डाबी यांचे दुसरे लग्न प्रदिप गावंडे यांच्यासोबत झाले आहे. प्रदिप हेही आयएएस अधिकारी आहेत. बाडमेरजवळ असलेल्या जलोर येथील ते जिल्हाधिकारी आहेत. या दोघांना आता एक मुलगाही आहे.


