- Home
- India
- जय जय श्रीराम.. अयोध्येतील राम मंदिराचे बांधकाम पूर्ण, Inside Photo मध्ये पाहा थक्क करणारी वास्तुकला!
जय जय श्रीराम.. अयोध्येतील राम मंदिराचे बांधकाम पूर्ण, Inside Photo मध्ये पाहा थक्क करणारी वास्तुकला!
Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिराचे बांधकाम पूर्ण होत आले आहे. २५ नोव्हेंबर २०२५ रोजी ध्वजारोहण सोहळा होणार असल्याची माहिती श्रीरामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने दिली आहे. ट्रस्टने मंदिराचे फोटोही सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

ध्वजारोहण सोहळा ( Ayodhya Ram Mandir )
ध्वजारोहण सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रित केले आहे, असे श्रीरामजन्मभूमी मंदिर बांधकाम समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी सांगितले. पंतप्रधान या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
थक्क करणारे कोरीवकाम ( Ayodhya Ram Mandir )
भारताच्या वास्तुकलेचा वारसा दर्शवणारे, गुंतागुंतीचे आणि अतिशय सुंदर कोरीवकाम हे मंदिराचे मुख्य आकर्षण आहे.
वास्तुकला आणि अध्यात्म ( Ayodhya Ram Mandir )
मंदिराच्या प्रत्येक कोपऱ्यात रामायणातील कथा दाखवण्यात आल्या आहेत. यामुळे पर्यटकांना केवळ वास्तुकलाच नाही, तर भारताच्या समृद्ध पौराणिक आणि आध्यात्मिक परंपरेशी जोडले जाण्यास मदत होते.
मंदिरातील पाच भव्य हॉल ( Ayodhya Ram Mandir )
मंदिरात नृत्य मंडप, रंग मंडप, सभा मंडप, प्रार्थना मंडप आणि कीर्तन मंडप असे पाच वेगवेगळे हॉल आहेत.
श्रीराम दरबार ( Ayodhya Ram Mandir )
श्रीराम, सीता, हनुमान, भरत, लक्ष्मण आणि शत्रुघ्न यांच्या संगमरवरी मूर्ती असलेला श्रीराम दरबार मंदिराच्या मध्यभागी आहे.
उत्कृष्ट कारागिरीचा नमुना ( Ayodhya Ram Mandir )
मंदिरात एकूण ३९२ खांब आहेत. त्यापैकी प्रत्येक खांब कारागिरांच्या विलक्षण कौशल्याचे प्रदर्शन घडवतो.

