दिवाळीपूर्वी मोठं सरप्राईज! या राज्यातील महिलांना मिळणार मोफत गॅस सिलिंडर!
Free LPG Cylinders for Women : दिवाळीनिमित्त उत्तर प्रदेश सरकार प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत महिलांना मोफत एलपीजी सिलिंडर देत आहे. या योजनेचा फायदा सुमारे 1.86 कोटी महिलांना होणार असून, सिलेंडर वाटप आधीच सुरू झाले आहे.

दिवाळीचा सण
देशभरात दिवाळीचा सण साजरा केला जाणार आहे. या निमित्ताने कोट्यवधी महिलांना एक मोठी भेट मिळणार आहे. प्रत्येक राज्यात महिलांसाठी विशेष योजना आहेत. काही ठिकाणी मासिक मदत, तर काही ठिकाणी अतिरिक्त लाभ दिले जातात.
महिलांना मोफत सिलिंडर
या सणासुदीच्या काळात महिलांना मोफत एलपीजी सिलिंडर मिळणार आहेत. सिलिंडर वाटपाचे काम आधीच सुरू झाले आहे. या योजनेअंतर्गत 1.86 कोटी महिलांना फायदा होईल, असे सरकारने जाहीर केले आहे.
प्रधानमंत्री उज्ज्वला योजना
प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत 1.85 कोटी महिलांना दोन सिलिंडर मोफत दिले जातील. एलपीजी रिफिलचे वाटप बुधवारपासून सुरू झाले आहे.
मोफत एलपीजी रिफिल
ही योजना उत्तर प्रदेशमध्ये राबवली जात आहे. तेथील महिलांना दिवाळीपूर्वी मोफत गॅस मिळेल. मोफत एलपीजी रिफिल वर्षातून दोन टप्प्यांत दिले जातील.
₹1,500 कोटींचे बजेट
या योजनेसाठी उत्तर प्रदेश सरकारने ₹1,500 कोटींचे बजेट ठेवले आहे. पहिल्या टप्प्यात 1.23 कोटी आधार-लिंक्ड लाभार्थ्यांना गॅस रिफिल दिले जाईल.

