उदय सामंत; रमेश म्हात्रेंच्या कृतीला शिवसेनेचा पाठिंबा नाही

Share this Video

मुंबईत माध्यमांशी बोलताना मंत्री उदय सामंत यांनी डोंबिवलीतील डॉक्टर मारहाण प्रकरणात अटक झालेल्या शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्याबाबत पक्षाची भूमिका स्पष्ट केली. रमेश म्हात्रे यांनी केलेल्या कृतीला शिवसेना, पक्षाचे नेते किंवा एकनाथ शिंदे यांनी कोणताही पाठिंबा दिलेला नसल्याचे त्यांनी सांगितले. पक्षाच्या नियमांची जाणीव करून देण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी स्वतः त्यांच्याशी संवाद साधल्याचेही सामंत यांनी नमूद केले. तसेच पोलिसांनी केलेल्या कारवाईत कोणत्याही पक्षनेत्याने हस्तक्षेप केलेला नसल्याचा दावाही त्यांनी केला.

Related Video