आदित्य ठाकरेंची मतदार नोंदणीसाठी 3 मागण्या

Share this Video

मुंबईत मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार आदित्य ठाकरे यांनी मतदार नोंदणी प्रक्रियेबाबत तीन महत्त्वाच्या मागण्या मांडल्या. गेल्या दहा दिवसांतील मुसळधार पावसामुळे सुरू असलेल्या नोंदणी प्रक्रियेला 10 दिवसांची मुदतवाढ द्यावी, अशी पहिली मागणी त्यांनी केली. पुनर्विकासामुळे ट्रान्झिट कॅम्प किंवा भाड्याच्या घरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी पुनर्विकास प्रकल्पांवरच नोंदणी केंद्रे उभारावीत, अशी दुसरी मागणी त्यांनी मांडली. तसेच मुंबईतील गृहनिर्माण संस्थांमध्ये अध्यक्ष आणि सचिवांच्या समन्वयाने एका दिवसात नोंदणी प्रक्रिया पूर्ण करता येईल, असा प्रस्तावही त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांसमोर ठेवला.

Related Video