सार
अमेठी आणि रायबरेलीतून काँग्रेसने अद्याप उमेदवार जाहीर केलेले नाही. त्यामुळे याठिकणाहून काँग्रेसला उमेदवार मिळेना अशी चर्चा रंगली आहे.उमेदवारांच्या चौथ्या यादीतही त्याठिकाणची उमेदवारी नसल्याने या चर्चाना उधाण आले आहे .या यादीत 46 उमेदवारांची नावे आहेत
दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने देशपातळीवर आता चौथी यादीही जाहीर केली आहे.परंतु या यादीनुसार अमेठी आणि रायबरेली या मतदार संघातील उमेदवारांचे नाव अद्याप या यादीत नसल्याने चर्चा रंगल्या आहेत. तसेच यामध्ये दिग्विजय सिंह याना मध्यप्रदेशातील राजगडमधून तिकीट देण्यात आले तर अजय राय यांना वाराणसीतून पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात रिंगणात उभे केले आहे.
काँग्रेसने शनिवारी चौथी यादी जाहीर केली असून यामध्ये 46 उमेदवारांचा समावेश आहे. यामधे उत्तर प्रदेशातील 9, उत्तराखंड मधील 2, आणि मध्यप्रदेशातील 12 उमेदवार. याशिवाय आसाममधील 1, जम्मूकाश्मीर 2, मणिपूर 2 आणि पश्चिम बंगाल 1. अशा प्रकारे काँग्रेस 13 जागांवर 46 उमेदवार लढणार आहेत.
दानिश अली यांनाही उमेदवारी :
बसपा मधून काँग्रेस मध्ये प्रवेश केलेले दानिश अली यांना देखील उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. अखेर त्यांच्या उमेदवारीवरून सुरु असलेल्या चर्चाना पूर्ण विराम मिळाला. दानिश अली हे रमेश विधुडी प्रकरणापासून चर्चेत आले होत. त्यानंतर बहुजन समाज पार्टीने त्यांची पक्षातून हकालपट्टी केली होती. त्यानंतर त्यांनी काँग्रेस मध्ये प्रवेश केला आणि त्यांना अमरोह मधून उमेदवारी जाहीर करण्यात आली. याशिवाय सहारनपूरमधून इम्रान मसूद, फतेहपूर सिक्रीमधून रामनाथ सिकरवार, कानपूरमधून आलोक मिश्रा, झाशीमधून प्रदीप जैन आदित्य, बाराबंकीमधून तनुजा पुनिया, देवरियातून अखिलेश प्रताप सिंग, बन्सगाव एससीमधून सदन प्रसाद यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील उमेदवारांची नावे
चौथ्या यादीत महाराष्ट्रातून चार उमेदवारांची नावं असून यामध्ये रामटेक मधून रश्मी बर्वे, भंडारा गोंदिया मधून प्रशांत पडोळे, नागपूर विकास ठाकरे तर गडचिरोलीमधून नामदेव किरसान यांचा समावेश आहे.
आता पर्यंत 185 उमेदवारांची घोषणा :
लोकसभा निवडणुकीसाठी आता पर्यंत एकूण 185 उमेदवारांची घोषणा झाली आहे.काँग्रेसने उमेदवारांची पहिली यादी 8 मार्च रोजी प्रदर्शित केली होती त्यामध्ये 39 उमेदवारांचा समावेश होता. पहिल्या यादीत राहुल गांधी यांचा देखील समावेश होता. तर दुसरी यादी 12 मार्च रोजी जाहीर करण्यात आली होती.यात 43 उमेदवारांचा समावेश होता.
आणखी वाचा :
प्रदोष काळात भद्र असल्यामुळे केवळ होळीची पूजा करता येणार, मात्र होळी दहन रात्री ११ नंतर
रशियन पोलिसांनी मॉस्को हल्ल्यातील 2 आरोपींना फिल्मी स्टाईलमध्ये पकडले, 3 जणांचा शोध सुरू