बेळगाव जिल्ह्यातील मुडलगी तालुक्यातील शिवापूर येथील अडवीसिद्धेश्वर मठात एका स्वामीसोबत महिला आणि तिची मुलगी एका खोलीत आढळल्याने गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला. महिलेसोबत गैरवर्तन झाल्याचे वृत्त समोर आले आहे.

बेळगाव जिल्ह्यातील मुडलगी तालुक्यातील शिवापूर येथील अडवीसिद्धेश्वर मठात २१ जून रात्री एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली. मठात एका स्वामीसोबत महिला आणि तिची मुलगी एका खोलीत दिसल्याने परिसरात संतापाची लाट उठली आणि गावकऱ्यांनी जोरदार रॅली काढली

गावकऱ्यांचा संताप

गावातील रहिवाशांनी मठाबाहेर जमाव रचून घटनास्थळी धडक दिली. त्यांनी स्वामी अडवीसिद्धराम यांना खोलीतून बाहेर काढून मारहाण केली आणि पलंगावर बसून टोलेबाजी केली. घटना इतकी गंभीर होती की, स्वामींच्या कपाळाला दुखापत झाली

महिलेला आणि मुलीला त्रास

या घटनेत काही तरुणांनी त्या महिलेसोबत गैरवर्तन केल्याचं समोर आलं आहे. त्यात तिच्या मुलीचे कपडे फाडले आहेत. ज्यामुळे गावात नैतिक आणि कायदेशीर प्रश्न उपस्थित झाले आहेत

पोलिसांचं हस्तक्षेप

पोलीस घटनास्थळी तातडीने दाखल झाले, परिस्थिती आटोक्यात आणली आणि त्या महिला व मुलीला सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. त्यांना समुपदेशन केंद्रात ठेवून तत्काळ मदत मिळवण्यात आली. त्यानंतर गावकऱ्यांच्या दबावाखाली पोलिसांनी स्वामींना रात्रीच मठातून हटवून एका सुरक्षित स्थळी हलवले. सद्यःस्थितीत स्वामी गोकाक येथे आहेत

यापूर्वी घडल्या होत्या घटना

रायबाग तालुक्यातील मेकळी गावातील हठयोगी लोकेश्वर स्वामी यांच्याविरोधात अल्पवयीन मुलीशी संबंधित गंभीर आरोप होते. त्या प्रकरणातील त्रासदायक घटना महाराष्ट्रात सगळीकडे हाहाकार उडाला होता.