हरियाणामध्ये एका व्यक्तीला 10 मुलींनंतर 11 वे अपत्य मुलगा झाला. यानंतर एका मुलाखतीत वडिलांना आपल्या सर्व मुलींची नावे सांगता आली नाहीत, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

हरियाणामधून एक अनोखा आणि धक्कादायक प्रकार समोर आला असून त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका वडिलांना त्यांच्या स्वतःच्या 10 मुलींची नावे सांगताना बोलता येत नसल्याचे दिसत आहे. 11व्या अपत्याच्या जन्मानंतर हा प्रकार समोर आला आहे.

व्हिडीओ झाला व्हायरल 

या कुटुंबात यापूर्वी 10 मुली आहेत. नुकताच पत्नीने 11व्या बाळाला जन्म दिला असून यावेळी मुलगा झाला आहे. विशेष म्हणजे, या कुटुंबात तब्बल 19 वर्षांपासून एकामागोमाग एक अपत्य जन्माला येत आहे. मुलाच्या जन्मानंतर कुटुंबाची चर्चा संपूर्ण परिसरात सुरू झाली. माध्यमांनी वडिलांशी संवाद साधताना सर्व मुलींची नावे विचारली असता ते गोंधळले. काही नावे सांगितल्यानंतर त्यांना पुढील नावे आठवेना. हा क्षण कॅमेऱ्यात कैद झाला आणि तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ 

माहिती हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या. अनेकांनी या घटनेवर टीका करत इतकी अपत्ये जन्माला घालणे आणि त्यांची नावेही लक्षात न राहणे ही गंभीर बाब असल्याचे म्हटले. काही युजर्सनी पालकत्वाबाबत प्रश्न उपस्थित केले. काही लोकांनी या प्रकरणातून आजही समाजात असलेली मुलगा-मुलगी भेदभावाची मानसिकता अधोरेखित होते, असे मत व्यक्त केले. “10 मुलींनंतर मुलगा झाल्याचा आनंद आणि त्यावर मिळणारी प्रसिद्धी हे समाजाच्या विचारसरणीचे प्रतिबिंब आहे,” अशी प्रतिक्रिया अनेकांनी दिली. दरम्यान, संबंधित वडिलांनी स्पष्टीकरण देताना आपण सर्व मुलांवर प्रेम करतो आणि मुलींनाही चांगले शिक्षण देण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगितले. मात्र हा व्हिडीओ आजही सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत असून समाजातील वास्तवावर पुन्हा एकदा प्रकाश टाकत आहे.