गुजरात उच्च न्यायालयातील सुनावणी दरम्यान एका व्यक्तीने टॉयलेट सीटवर बसून ऑनलाईन मीटिंगला हजेरी लावली. ही घटना २० जून रोजी घडली असून यावेळी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग सुरु होती. नंतर त्यानं मोबाईल जमिनीवर ठेवून स्वच्छता केली.
सकाळी टॉयलेटला जाताना मोबाईल घेऊन जाण्याची सवय अनेकांना लागलेली आहे. तिथं गेल्यानंतर रिल्स, व्हिडीओ किंवा सोशल मीडिया पाहिलं जात. त्यातच गुजरात उच्च न्यायालयातील सुनावणीमध्ये एका व्यक्तीनं टॉयलेट सीटवर बसून ऑनलाईन मीटिंगला हजेरी लावली. ही घटना २० जून रोजी घडली असून यावेळी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग सुरु होती.
मोबाईल फोन जमिनीवर ठेवून केली स्वच्छता
गुजरात उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती निरजार एस देसाई यांची झूम मिटिंग सुरु होती. हि मिटिंग सुरु असताना झुमवर समद बॅटरी नाव असलेल्या व्यक्तीचा कॅमेरा सुरु होता. तो व्यक्ती टॉयलेट सीटवर इअरफोन घालून मिटिंग अटेंड करत होता. नंतर त्यानं मोबाईल जमिनीवर ठेवून स्वच्छता केली. अशा प्रकारे हा व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळं सोशल मीडियावर लोकांनी विविध प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
सुनावणी कशाची होती?
कोर्टच्या रेकॉर्डनुसार व्हायरल व्हिडिओमधील माणूस हा प्रतिवादी होता. यावेळी दोनही बाजूंचे म्हणणं कोर्टाने ऐकून घेतलं. त्यानंतर एफआयआर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.
याआधी अशा घटना घडल्यात
गुजरात उच्च न्यायालयाने एका व्यक्तीला शौचालयातून न्यायालयीन कामकाजात सहभागी झाल्याबद्दल २ लाख रुपयांचा दंड ठोठावला होता. त्या घटनेच्या एक महिना आधी आणखी एका व्यक्तीला पलंगावर झोपून काम केल्याबद्दल २५,००० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.
