सार

अयोध्या येथील राम मंदिरात राम लल्लासाठी चार मिनिटांचे सूर्य तिलक लावण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

अयोध्या येथील राम मंदिरात राम लल्लासाठी चार मिनिटांचे सूर्य तिलक लावण्याचे नियोजन करण्यात आले आहे. राम मंदिराच्या उदघाटनानंतर आयोजित केली जाणारी ही रामनवमी सर्वात खास असणार आहे. 

भारतातील संशोधक सूर्य तिलकची तयारी करत आहेत - 
अयोध्येत भव्य दिव्या असा सूर्य तिलकचा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. भारतातील संशोधक या कार्यक्रमासाठी लागणारे सर्व साहित्य मंदिरातच बसवणार आहे. याबाबतची एक चाचणी आधी आयोजित केली जाणार असून येथे राम नवमीच्या उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. राम लल्लाच्या चेहऱ्यावर दुपारी बारा वाजता सूर्याचा प्रकाश पोहचेल.

त्यानंतर ही किरणे चार मिनिटे मूर्तीवर राहणार आहेत. येथे संशोधक राहणार असून त्यांच्या मदतीनेच हा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. राम मंदिरात राम नवमीच्या दिवशी होणाऱ्या या कार्यक्रमामुळे सगळीकडे याबाबतच्या चर्चेला उधाण आले आहे. भाविक भक्तगण या क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी इच्छुक असून ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहणार आहेत. 
आणखी वाचा - 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंची का सोडली साथ? उद्धव ठाकरे नेत्यांना द्यायचे अशी वागणूक
पानाच्या दुकानावर झालेल्या भांडणातून महाराष्ट्रात झाला खून, नेमकं घडलं काय?