लखनऊहून परतणाऱ्या कुटुंबाची कार झाडावर आदळून भीषण अपघात झाला. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला असून दोघे जखमी झाले आहेत. मृतांमध्ये वडील, मुलगी आणि वहिनीचा समावेश आहे.
अपघातांचे प्रमाण सध्याच्या काळात मोठ्या प्रमाणावर वाढत चाललं आहे. लखनऊहून मुलीवर उपचार करून परतणाऱ्या कुटुंबाची कार झाडावर आदळून तीन जणांचा मृत्यू झाला. सोमवार (३० जून) रात्री १०.३० वाजता हा अपघात झाला. उत्तर प्रदेशातील लखीमपूर भिरा महामार्गावरील मालपूर येथे हा भीषण अपघात झाला.
अपघात एवढा भीषण होता की...
सोमवारी रात्री हा भीषण अपघात झाला. मृतांमध्ये जितेंद्र कुमार उर्फ राजा पटेल (३२), त्यांची ४ वर्षांची मुलगी श्रद्धा आणि वहिनी सीमा देवी (३२) यांचा समावेश आहे. जितेंद्र आणि त्यांच्या मुली बोटाच्या श्रद्धाच्या बोटावर उपचार करायला लखनऊला गेले होते. सोमवारी रात्री १०.३० च्या सुमारास हा अपघात झाला. जितेंद्रची पत्नी सुषमा आणि कारमध्ये प्रवास करणारा शिवम गंभीर जखमी झाले आहेत.
दोघांवर आयसीयूमध्ये उपचार सुरु
दोघांवर आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत. ही धडक एवढी भयानक होती की आर्टिगा कारचे तुकडे तुकडे झाले आहेत. कारच्या मागच्या सीटवर बसलेला हर्षित हा गाडीतून उडून बाहेर पडला, त्यानेच घरी कॉल करून अपघाताची माहिती दिली. यावेळी कुटुंबाला माहिती मिळाल्यानंतर अंकित बाजपेयी हे त्याठिकाणी आले आणि त्यांनी जखमींना गाडीच्या बाहेर काढले. एकाच कुटुंबातील तिघांच्या मृत्यूमुळे शोककळा पसरली आहे.
