2 Year Old Child Abandoned On Pune Ernakulam Express : ट्रेनमध्ये बेवारस अवस्थेत सापडलेल्या दोन वर्षांच्या मुलाच्या पालकांना शोधण्यासाठी पोलिसांनी राज्यव्यापी तपास सुरू केला आहे.

2 Year Old Child Abandoned On Pune Ernakulam Express : ट्रेनमध्ये बेवारस अवस्थेत सापडलेल्या दोन वर्षांच्या मुलाच्या पालकांना शोधण्यासाठी पोलिसांनी राज्यव्यापी तपास सुरू केला आहे. या महिन्याच्या १७ तारखेला पुणे-एर्नाकुलम एक्सप्रेसमध्ये हा मुलगा बेवारस अवस्थेत सापडले. त्रिशूर आणि आलुवा दरम्यान पालकांनी मुलाला सोडून पलायन केले असावे, असा अंदाज आहे. मुलाला बालकल्याण समितीच्या संरक्षण केंद्रात हलवण्यात आले आहे. हा मुलगा मल्याळी आहे की नाही, याबाबत स्पष्टता नाही. या घटनेप्रकरणी एर्नाकुलम रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.