सार
एशियानेट न्यूज पोर्टलवर 13 सप्टेंबरच्या प्रमुख राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बातम्या वाचा आणि ताज्या अपडेट्स जाणून घ्या फक्त एका क्लिकवर…
- उत्तराखंडमधील कामेडा, नंदप्रयाग आणि छिंका येथे भूस्खलन झाल्याने बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्ग ठप्प झाला आहे.
- उत्तर प्रदेशात गेल्या काही दिवसांपासून लांडग्यांचा नागरिकांवर होणाऱ्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसून येत आहे. नुकत्याच दोन महिलांवर लांडग्याने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणातील दोन्ही महिलांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
- मुंबईतील लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भाविकांची दररोज तुडूंब गर्दी होताना दिसून येत आहे. आज गणेशोत्सवाचा सातवा दिवस असून 17 सप्टेंबरला बाप्पाला निरोप दिला जाणार आहे.
- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी भाजप नेत्यांचं विचारमंथन झालं. येथे भाजप नेत्यांना महायुतीतील नेत्यांवर टीका न करता सरकारच्या जास्तीत जास्त योजना लोकांपर्यंत पोहचवण्याचं आवाहन केलं.
- भाजपच्या सर्व्हेमध्ये विदर्भात पक्ष मागे असल्याचं दिसून आलं आहे.
- पूजा खेडकर खोत बोलत असल्याचा दावा यूपीएससीने न्यायालयात केला आहे.
- पुणे फेस्टिवलच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी खासदार सुरेश कलमाडी हे एकाच स्टेजवर येणार आहेत. अजित पवार यांनी दोघांमधील वैर सोडून हा निर्णय घेतल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.