सार

एशियानेट न्यूज पोर्टलवर 11 ऑक्टोबर प्रमुख राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बातम्या वाचा आणि ताज्या अपडेट्स जाणून घ्या फक्त एका क्लिकवर…

  • आरआरएस नेते सुरेश भैय्याजी जोशी यांनी हरिद्वार कोणत्या जातीशी संबंधित आहे अशा प्रश्न उपस्थितीत केला आहे. याशिवाय देशातील 12 ज्योतिर्लिंगही कोणत्या जातीचे आहेत असा प्रश्न विचारला आहे.
  • महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने राज्य सरकारकडून वर्ष 2024-25 साठी संविधानाच्या 75 व्या वर्षानिमित्त शाळा, महाविद्यालये व शैक्षणिक संस्थांमध्ये 'घर घर संविधान' उपक्रम राबण्याची घोषणा करण्यात आली आहे.
  • जयप्रकाश नारायण यांच्या जयंतीनिमित्त समाजवादीचे प्रमुख अखिलेश यादव गोमती नगरमधील जयप्रकाश नारायण आंतरराष्ट्रीय सेंटरला भेट देणार आहेत. याआधीच लखनौमध्ये समाजवादी पक्षाच्या कार्यालयाबाहेर पोलीस तैनात करण्यात आले आहेत.
  • इंडियन मेडिकल असोसिएशनकडून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना ज्युनिअर डॉक्टर्सकडून केल्या जाणाऱ्या आंदोलनासंबंधिच पत्र लिहिले आहे.
  • महाराष्ट्रातील पुण्यात अन्नातून विषबाधा झाल्यामुळे 30 विद्यार्थी आजारी पडल्याचे प्रकरण समोर आले आहे.