सार

पिलिभीत येथील कोतवाली भागातील राहुल नगर चांदीया हजारा गावातील विवाहात मॅगी खाल्याने दहा वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. 

पिलिभीत येथील कोतवाली भागातील राहुल नगर चांदीया हजारा गावातील विवाहात मॅगी खाल्याने दहा वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. यामुळे सगळीकडे एकच हाहाकार उडाला आहे. पिलिभीत येथील कोतवाली भागातील राहुल नगर चांदीया हजारा गावात घटना घडली आहे. सीमा या त्यांच्या पती आणि मुलांसोबत माहेरी आल्या होत्या. त्या बऱ्याच दिवसांपासून माहेरीच राहत होत्या. 

मॅगीमुळे काय घडली घटना -
गुरुवारी सायंकाळी मॅगीचा भात करण्यात आला होता. यावेळी ही मॅगी खाल्यामुळे सर्वांनाच त्रास व्हायला लागला. शुक्रवारी सकाळी सर्वांना गावातील दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्रकृतीत सुधारणा झाल्यावर ते घरी परतले. शुक्रवारी रात्री पुन्हा सर्वांची प्रकृती ढासळू लागली. अस्वस्थतेसोबतच त्याला जुलाबही होऊ लागले. सोनूचा मुलगा रोहन (12) याचा शनिवारी सकाळी मृत्यू झाला. यामुळे इतर लोक घाबरले. सर्वांना उपचारासाठी पुरणपूर सीएचसीमध्ये दाखल करण्यात आले.

सीमा यांचा दुसरा मुलगा विवेक याच्या प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले. कुटुंबातील सर्व सदस्य एकाच वेळी आजारी पडल्याने एकच खळबळ उडाली. सीएचसीचे डॉ. रशीद म्हणाले की, आजारी पडलेल्या सर्व लोकांमध्ये अन्नातून विषबाधा झाल्याची लक्षणे आहेत. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. एका मुलाचा ही मॅगी खाल्यामुळे मृत्यू झाला आहे. 
आणखी वाचा - 
दोहा डायमंड लीगमध्ये नीरज चोप्राने भारताचे नाव केले रोशन, भालाफेकमध्ये मिळवले रौप्य पदक
D-Voter म्हणजे कोण? ज्यांना देशात राहूनही करता येत नाही मतदान