'ही' प्रसिद्ध अभिनेत्री वडिलांचे लावत नाही नाव, कारण ऐकून म्हणाल तुलाच जमलं!
प्रसिद्ध अभिनेत्री तब्बूने लहानपणीच तिच्या आई-वडिलांचा घटस्फोट पाहिला. वडिलांबद्दल मनात द्वेष असल्याने आणि त्यांच्यासोबत कोणतीही आठवण नसल्याने, ती तिचे पूर्ण नाव तबस्सुम फातिमा लावते, वडिलांचे आडनाव वापरत नाही.

'ही' प्रसिद्ध अभिनेत्री वडिलांचे लावत नाही नाव, कारण ऐकून म्हणाल तुलाच जमलं!
बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्री अशा आहेत ज्या अजूनही तरुण आहेत. त्यामध्ये खासकरून तब्बू या अभिनेत्रीचा समावेश होतो. तिने दोन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि पद्मश्री देखील जिंकला आहे.
अभिनेत्रीच्या मनात वडिलांबद्दल होता द्वेष
अभिनेत्रीच्या मनात आपल्या वडिलांबाबत द्वेष असल्याचं तिने सांगितलं. 4 नोव्हेंबर 1971 रोजी हैदराबादी मुस्लिम कुटुंबात जन्मलेली ती जमाल अली हाश्मी आणि रिझवाना यांची मुलगी. जमाल हे पाकिस्तानातील एक लोकप्रिय अभिनेता होते. 1970 च्या दशकात त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले होते.
लहानपणी वडिलांचे मिळाले नाही प्रेम
लहानपणी तब्बूला वडिलांचे प्रेम मिळाले नाही. ती तीन वर्षांची असताना तिच्या पालकांचा घटस्फोट झाला होता. त्यामुळे तब्बू आणि तिच्या बहिणीची जबाबदारी आईवर येऊन पडली होती.
सिम्मी गरेवालला यांना दिली मुलाखत
सिम्मी गरेवालला यांनी तब्बूची मुलाखत घेतली होती. त्यावेळी तिने बोलताना आपलं मत व्यक्त केलं. तब्बू म्हणते की, "माझे बालपण खूप छान गेले. आम्ही लहापणीचे आयुष्य हैदराबादमध्ये घालवले. माझ्या पालकांच्या घटस्फोटानंतर, मी माझ्या आजी-आजोबांसोबत राहत होते.
आईसोबत घालवला वेळ
आईसोबत तब्बूने फार वेळ घालवला, तिची आई शिक्षक असल्यामुळं दोघी बरोबर राहत होत्या. माझी आई प्रार्थना करायची आणि आणि पुस्तके वाचायची. मी त्याच वातावरणात वाढले. मी खूप लाजाळू होते.
तब्बू तीच पूर्ण नाव काय लावते?
तब्बू हि तिचे पूर्ण नाव तबस्सुम फातिमा असं लावत असल्याचं तिने सांगितलं आहे. ती वडिलांचे आडनाव लावत नसल्याबद्दल विचारल्यावर तिने वडिलांबाबत माझ्याकडे काही आठवणी नसल्याचं म्हटलं आहे.