बॉलिवूड अभिनेत्री तारा सुतारियाने सोशल मीडियावर नवीन फोटो शेअर केले आहेत ज्यात ती एपी ढिल्लोसोबत दिसत आहे. तिच्या सोनेरी बॅकलेस ड्रेसने सर्वांचे लक्ष वेधून घेतले असून, वीर पहारियाच्या कमेंटमुळे त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री तारा सुतारीया ही कायमच चर्चेत राहणारी अभिनेत्री आहे. तिने आता सोशल मीडियावर फोटो शेअर केले असून ती परत एकदा चर्चांमध्ये आली आहे. या फोटोंमध्ये तिच्यासोबत एपी ढिल्लोसोबतचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोला फॅन्सने मोठ्या प्रमाणावर लाईक्स आणि कमेंट मोठ्या प्रमाणावर केले आहेत.

खूपच रोमँटिक फोटो 

तारा आणि एपी या दोघांनी टाकलेले फोटो खूपच रोमँटिक असल्याचे इंस्टाग्रावरून दिसलं आहे. सोशल मीडियावर घडलेल्या फोटोंपेक्षा दुसऱ्याच एका गोष्टींमुळे लक्ष वेधून घेतलं आहे. ताराचा ड्रेस या फोटोमध्ये खूप सुंदर दिसून आली आहे. या फोटोंमध्ये ताराने सोनेरी बॅकलेस हॉल्टर-नेक मिनी ड्रेस घातला असून ती खूपच छान दिसत आहे.

रिलेशनशिपच्या चर्चा झाल्या सुरु 

तारा सुतारिया आणि माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू रिलेशनशिपमध्ये आले असल्याचे दिसून आलं आहे. मात्र, आता नेटकऱ्यांनी ते दोघं खरंच रिलेशनशिपमध्ये असल्याची खात्री दर्शवत आहेत. वीर पहारिया आणि तारा सुतारिया हे दोघे नात्यात आले असल्याचं सोशल मीडियातील नेटकऱ्यांनी व्यक्त केलं आहे.

वीर पहारिया याने केलेली कमेंट चर्चेत 

वीर पहारिया याने केलेली कमेंट चर्चेत आली आहे. वीर पहारियाने 'माय शायनी स्टार' अशी कमेंट केली आहे. त्यावर ताराने रिप्लाय करत, 'माईन' असं लिहिलं असून इव्हील आयचं ईमोजी जोडलं आहे. त्यावर इतर युझरने कमेंट केली असून त्या कमेंटला लाईक मोठ्या प्रमाणावर आले आहेत.

जान्हवी कपूर आणि वीर पहारिया दोघे रिलेशनशिपमध्ये 

जान्हवी कपूर आणि वीर पहारिया हे दोघे रिलेशनशिपमध्ये होते. त्या दोघांनी अजूनही आपल्या ब्रेकअपबद्दलची माहिती दिली नसून त्यांना कायमच सोबत पाहण्यात आले आहे. त्यामुळं आता त्यांचं ब्रेकअप झालं की काय, अशी चर्चा सुरु झाली आहे.