नागराज मंजुळे दिग्दर्शित 'सैराट' चित्रपटाने प्रचंड यश मिळवले. या चित्रपटानंतर प्रेक्षक 'सैराट २' ची आतुरतेने वाट पाहत आहेत, पण नागराज मंजुळे यांनी सध्या 'सैराट २' बनवण्याचा कोणताही विचार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

सैराट या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात राज तयार केलं. हा चित्रपट नागराज मंजुळे यांनी तयार केला होता. या चित्रपटाने संपूर्ण मराठी सिनेमा इंडस्ट्रीचा चेहरा बदलून टाकला. या सिनेमातील संगीत, संवाद, दिग्दर्शन सगळ्याच कौतुक मोठ्या प्रमाणावर झालं. कोणताही प्रसिद्ध चेहरा अभिनेत्यांनी या चित्रपटाच्या कामातून धुमाकूळ घेतला होता.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

सातासमुद्रापार पोहचला चित्रपट 

अरची आणि परशा या दोघांची कहाणी या चित्रपटाची प्रेक्षकांपर्यंत पोहचली होती. आजही या चित्रपटाची क्रेज मोठ्या प्रमाणावर तयार होत चालली आहे. या चित्रपटाची क्रेझ इतकी मोठी आहे की तो हिंदीमध्ये बनवण्यात आला होता. मराठीमध्ये १०० कोटी कमवणारा हा पहिलाच चित्रपट ठरला होता. त्यानंतर आता सर्वजण सैराट २ ची वाट पाहत आहे.

नागराज मंजुळे का म्हणाले? 

सैराट २ चित्रपट येणार का असा प्रश्न नागराज मंजुळे यांना विचारण्यात आला होता. खऱ्या आयुष्यात प्रेम करणाऱ्या लोकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. मी या सिनेमाकडे कधीच आव्हान म्हणून पाहिलं नाही. सैराट २ चित्रपटाचा सिक्वल येणार म्हणून मी कधीही विचार केलेला नाही. सध्या सैराट २ हा चित्रपट येण्याचा मी विचार केलेला नाही.