बॉर्डरचा दुसरा भाग बॉर्डर २ येतोय प्रेक्षकांच्या भेटीला. सनी देओलने चित्रपटाचे पोस्टर आणि रिलीज डेट जाहीर केली आहे. चित्रपटात वरुण धवन, अहान शेट्टी, दिलजीत दोसांझ, मेधा राणा, मोना सिंह आणि सोनम बाजवा देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

बॉर्डर सिनेमातील गाणे आजही १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला वाजवले जातात. या चित्रपटातील सनी देओलचा अभिनय आजही आवडीने पहिला जातो. त्याच चित्रपटाचा दुसरा पार्ट म्हणजे बॉर्डर २ हा प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच येणार आहे. अभिनेता सनी देओल याने चित्रपटाची रिलीज डेट आणि पोस्टर लॉन्च केलं आहे.

पहिलं पोस्टर प्रेक्षकांना पाहता येणार 

पहिलं पोस्टर हे प्रेक्षकांना पाहता येणार आहे. बॉर्डर २ चित्रपटाच्या पोस्टरमध्ये सनी देओल हा पुढं उभं राहून लढताना दिसत आहे. यावेळी त्याचा आक्रमक लूक हा प्रेक्षकांना मोठ्या प्रमाणावर आवडला असल्याचं दिसून येत आहे. अनेक प्रेक्षकांनी या पोस्टवर कमेंट केल्या असून लाईक्सचा पाऊस पडला आहे.

View post on Instagram

सनी देओल काय म्हणतो? 

हिंदुस्थानसाठी पुन्हा लढूया. बॉर्डर २ हा चित्रपट सिनेमागृहात २२ जानेवारी २०२६ रोजी येणार आहे. यावेळी चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे. या चित्रपटाचे शूटिंग सुरु असून २२ जानेवारी रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या या चित्रपटाचे शूटिंग सुरु असून सनी देओल हा प्रेक्षकांना वेळोवेळी अपडेट देत आहे.

चित्रपटात कोण आहे? 

बॉर्डर 2 मध्ये सनी देओलसोबत वरुण धवन, अहान शेट्टी, दिलजीत दोसांझ, मेधा राणा, मोना सिंह आणि सोनम बाजवा महत्त्वाच्या भूमिका साकारणार आहेत. काही दिवसांपूर्वी वरुण धवनचा मिशा ठेवलेला पहिला लूक समोर आला होता, जो प्रेक्षकांना फार आवडला आहे.