आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी यांनी सुष्मिता सेनसोबतच्या नात्यावर पुन्हा एकदा भाष्य केले आहे. सुष्मिताला 'गोल्ड डिगर' म्हणणाऱ्यांना उत्तर देताना, त्यांनी स्वतःला 'केप्ट बॉयफ्रेंड' म्हटले आणि नात्यातील अनेक खर्च सुष्मिताच करत असल्याचे सांगितले. त्यांचे नाते आता संपले असले तरी ते एकमेकांबद्दल आदर बाळगतात, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आयपीएलचे माजी अध्यक्ष आणि उद्योगपती ललित मोदी यांनी अभिनेत्री सुष्मिता सेनबाबत केलेल्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा त्यांच्या नात्याची चर्चा रंगली आहे. काही वर्षांपूर्वी दोघांच्या नात्याची माहिती सार्वजनिक झाल्यानंतर सुष्मिता सेनला सोशल मीडियावर ‘गोल्ड डिगर’ अशी टीका सहन करावी लागली होती. आता ललित मोदी यांनी या आरोपांना थेट उत्तर देत सुष्मिताचे समर्थन केले आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

ललित मोदी काय म्हणाले? 

एका मुलाखतीत बोलताना ललित मोदी यांनी सुष्मिता सेन आर्थिकदृष्ट्या अत्यंत सक्षम आणि स्वावलंबी महिला असल्याचे सांगितले. तिच्यावर करण्यात आलेले ‘गोल्ड डिगर’चे आरोप वास्तवापासून दूर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सुष्मिताने स्वतःच्या मेहनतीने यश आणि संपत्ती मिळवली असल्याचेही त्यांनी नमूद केले. यावेळी ललित मोदी यांनी एक धक्कादायक खुलासाही केला. त्यांनी विनोदाच्या सुरात स्वतःलाच ‘केप्ट बॉयफ्रेंड’ म्हटले. त्यांच्या म्हणण्यानुसार, नात्यातील अनेक प्रसंगी खर्च सुष्मिताच करत असे आणि त्यामुळे तिच्यावर पैशांसाठी नातं जोपासल्याचा आरोप करणे चुकीचे आहे.

ललित यांनी सुश्मिताच केलं कौतुक 

ललित मोदी यांनी सुष्मिताचे कौतुक करत ती केवळ सुंदरच नाही तर अत्यंत यशस्वी आणि स्वतंत्र विचारांची महिला असल्याचे सांगितले. तिच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि कर्तृत्वाचा आदर करायला हवा, असे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच सुष्मिताविरोधात पसरवण्यात आलेल्या नकारात्मक कथनांमुळे त्यांना वाईट वाटल्याचेही त्यांनी नमूद केले. २०२२ मध्ये ललित मोदी यांनी सोशल मीडियावर सुष्मितासोबतचे फोटो शेअर करत त्यांच्या नात्याची घोषणा केली होती. त्या पोस्टनंतर सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली होती. अनेकांनी या नात्याबाबत विविध तर्क-वितर्क लावले, तर काहींनी सुष्मितावर टीकाही केली होती.

ललित मोदी आणि सुष्मिता सेन यांचे नाते आता संपलं असले तरी दोघेही एकमेकांविषयी आदराची भावना ठेवतात, असे ललित मोदी यांनी सांगितले. त्यांनी सुष्मिताला ‘खास व्यक्ती’ संबोधत तिच्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. त्यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा या चर्चित नात्याच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत.