- Home
- Entertainment
- Mastiii 4 X Review: मस्ती ४ चित्रपट पाहून लोकांच्या भावना झाल्या जागृत, प्रेक्षकांनी 'हा' सीन परत दाखवण्याची केली विनंती
Mastiii 4 X Review: मस्ती ४ चित्रपट पाहून लोकांच्या भावना झाल्या जागृत, प्रेक्षकांनी 'हा' सीन परत दाखवण्याची केली विनंती
कॉमेडी चित्रपट 'मस्ती ४' रिलीज झाला असून विवेक ओबेरॉय, रितेश देशमुख आणि आफताब शिवदासानी यांचे त्रिकुट पुन्हा एकदा प्रेक्षकांना हसवत आहे. चित्रपटाला सोशल मीडियावर प्रतिसाद मिळत आहे.

Mastiii 4 X Review: मस्ती ४ चित्रपट पाहून लोकांच्या भावना झाल्या जागृत, प्रेक्षकांनी 'हा' सीन परत दाखवण्याची केली विनंती
मस्ती ४ हा कॉमेडी आणि ऍडल्ट चित्रपट रिलीज झाला आहे. या चित्रपटात विवेक ओबेरॉय, रितेश देशमुख आणि आफताब शिवदासानी या त्रिकुट अभिनेत्यांनी प्रेक्षकांना पोट धरून हसायला लावलं आहे.
त्यांच्यासोबत 'हे' कलाकार चित्रपटात
त्यांच्यासोबत अजून इतर कलाकार चित्रपटात असून रूही सिंग, श्रेया शर्मा, एलनाज नौरोझी, नर्गिस फाखरी, अर्शद वारसी, तुषार कपूर, शाद रंधावा आणि निशांत मलकानी या कलाकारांनी या चित्रपटात काम केलं आहे.
मस्ती ४ चित्रपट हा आतापर्यंतचा सर्वात बेस्ट कॉमेडी चित्रपट
मस्ती ४ चित्रपट पाहिल्यानंतर, एका इंटरनेट युझरने एक्सवर लिहिले, "मस्ती ४ चित्रपटाचा रिव्ह्यू. निकाल: आतापर्यंतच्या सर्वोत्तम मनोरंजन करणाऱ्यांपैकी एक. मी चित्रपट पाहिला. माझ्याकडून ५ स्टार."
मस्ती ४ चित्रपटात तोच खट्याळ विनोद
मस्ती ४ चित्रपटात जुन्या मस्तीची ऊर्जा दिसून आली. तोच खट्याळ विनोद, तीच अमर्याद मजा... जुनाट आठवणी + नवीन गोंधळ, परिपूर्ण संयोजन." एका युझरने चित्रपटाला ५ पैकी फक्त १.५ स्टार रेटिंग दिले, त्यानं म्हटलं की, "हा एक विनोदी चित्रपट आहे ज्यामध्ये कोणतीही मजा दिसून येत नाही."
'या' कलाकारांचा OG म्हणून केला सन्मान
एका वापरकर्त्याने चित्रपटाला ५ पैकी ४ स्टार दिले आणि त्याचे रिव्ह्यू देताना लिहिले, "मस्ती ४ हा फुल टू हास्याचा धमाका चित्रपट आहे. चित्रपट जे वचन देतो ते पूर्ण करतो. या चित्रपटाचा सिक्वल त्याच्या शानदार शैलीसह परतला आहे, ज्याचे नेतृत्व ओजी त्रिकूट रितेश देशमुख, विवेक ओबेरॉय आणि आफताब शिवदासानी करत आहेत."

