मृणाल ठाकूर हिने बिपाशा बसूला बॉडी शेम केल्यामुळे वाद निर्माण झाला होता. यावर हिना खानने मृणालचे समर्थन केले आहे. हिनाने म्हटले आहे की, अनुभवातून ज्ञान मिळते आणि आपण सर्वच चुका करतो.

अभिनेत्री मृणाल ठाकूर ही छोट्या पडद्यापासून मोठ्या पडद्यापर्यंत दर्जेदार काम केलं आहे. अलीकडेच काही काळापूर्वी मृणालचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्या व्हिडीओवरून तिला मोठ्या प्रमाणावर टीकेचा सामना करावा लागला होता. आता तिने केलेल्या टीकेमुळे परत तिला एका नवीन वादाला तोंड द्यावं लागत असल्याचं दिसून आलं होत.

मृणालची समर्थन कोणी केलं? 

जुन्या मुलाखतीदरम्यान मृणालने बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बसूला बॉडी शेम केलेलं. मृणालने स्वतःला चांगलं म्हणत बिपाशाला मर्दानी म्हटलेलं. हा वाद मोठ्या प्रमाणावर वाढत चालला होता. त्यानंतर मृणालने बिपाशाची माफी मागितली होती. पण आता हिना खानने या प्रकरणात मृणालचं समर्थन केलं आहे.

माफीवर दिली प्रतिक्रिया 

हिना खानने इंस्टाग्राम स्टोरीवर रिप्लाय दिला आहे. यावर बोलताना ती म्हणते की, 'ज्ञान हे ज्ञानाच्या झाडाचं फळ आहे, जे अनुभवातून येतं. आपलं सामाजिक कौशल्य, संवाद आणि समजुतदारपणा काळानुसारच बदलतात. आपण सर्वजण चुका करतो, विशेषतः जेव्हा आपण तरुण असतो. मी मृणालला खूप चांगल्या प्रकारे समजू शकते, मीही भूतकाळात अशा मूर्ख चुका केल्या आहेत.

आपल्यापैकी काही जणांना ते हाताळण्याचं कौशल्य नसतानाही मोठे धोके पत्करावे लागतात. पण कालांतराने आपण बदलतो, आपण प्रेमळ बनतो. आपण एकमेकांना माफ करायला शिकतो. आपण एकमेकांचा आदर करतो.' हिनाने पुढं बोलताना तीच मत व्यक्त केलं आहे. ती म्हणते की, मृणाल आणि बिपाशा बसू दोघांचाही बॉलिवूडमध्ये प्रेरणादायी प्रवास झाला आहे आणि दोघीही खूप चांगल्या आहेत. हिना म्हणाली, 'तुम्हा सर्वांप्रमाणेच, मीही इंडस्ट्रीमध्ये बिपाशा आणि मृणाल दोघांचाही प्रेरणादायी प्रवास पाहिला आहे...दोघीही सुंदर आहेत आणि बिपाशा संपूर्ण इंडस्ट्रीसाठी एक आदर्श आहे. मला खूप आनंद आणि अभिमान आहे की मृणाल तिच्या भूतकाळात झालेली चूक स्वीकारू शकली.'