दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी मराठी जेवणाला 'गरिबांचं जेवण' म्हटल्याने वाद निर्माण झाला आहे. सोशल मीडियावर टीकेनंतर त्यांनी आपल्या वक्तव्याचा विपर्यास झाल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे.
काही दिवसांपासून बॉलिवूडचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री हे त्यांच्या का वक्तव्यामुळे परत एकदा चर्चेत आले आहेत. विवेक यांनी एका पॉडकास्टमध्ये मराठी जेवणाबद्दल वक्तव्य केलं आहे. त्यामुळे ते वादात अडकले आहेत. मराठी जेवणाला गरिबांच जेवण म्हणल्यामुळे त्यांच्यावर बरंच टीका केली आहे. या प्रकरणात त्यांनी आता स्वतःची बाजू मांडली आहे.
मुलाखतीमध्ये काय म्हटलं?
नुकत्याच एका मुलाखतीमध्ये विवेक यांनी मराठी जेवणाला नाव ठेवलं होत. त्यामध्ये ते विवेक यांनी आपलं मत मांडल आहे. मी दिल्लीचा असल्याने मला मसालेदार आणि झणझणीत जेवणाची सवय होती. लग्नानंतर पल्लवीने मला वरण-भात खा, असं म्हटलं होतं. मला सुरुवातीला वाटायचं की हे काय गरीबांच जेवण आहे असं मला वाटत असायचं.
सोशल मीडियावर केली टीका
त्यानंतर विवेक अग्निहोत्रीने सोशल मीडियावर बरीच टीका केली आहे. मराठी इंडस्ट्रीतील नेहा शितोळे आणि दिग्दर्शक महेश टिळेकर यांनी टीका केली आहे. त्यांच्या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर झालेल्या गदारोळामुळे आता विवेक अग्निहोत्रींना स्पष्टीकरण दिल आहे. माझ्या वाक्याचा विपर्यास केल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.
पॉडकास्टमध्ये काय माहिती दिली
पॉडकास्टमध्ये माहिती दिली असून म्हटलं की, आमच्याकडे कर्ली टेल्सची मुलगी पॉडकास्टमध्ये आली होती. गप्पा मारताना दिल्लीहून मुंबईला गेलो, तेव्हा पल्लवी जोशीने मला वरण भात खायला दिलं होतं. तेव्हा मी त्यांच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की, त्यांच्या जेवणात मीठ नसत, हे काय गरीब लोकांचे जेवण आहे वगैरे वगैरे पण त्यानंतर मला कळलं की, भारतात सगळ्यात जास्त आरोग्यदायी जेवण हे महाराष्ट्रीय जेवण आहे.
वरणभात हे माझं आवडीचं जेवण आहे आणि ते मी रोजच खात असतो. पण काही लोकांनी माझं सुरुवातीचं वाक्य एडिट केलं आणि महाराष्ट्रीय जेवणाला गरीब जेवण म्हटल्यावर माझ्यावर टीका केली. काही लोक वाक्य एडिट करून चुकीच्या पद्धतीनं पसरवतात. मला कोणत्या वादात अडकायचं नाही. विवेक अग्निहोत्री 'द बंगाल फाईल्स' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
