१९९५ मध्ये 'रघुवीर' चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान अभिनेत्री शिल्पा शिरोडकरचा गोळी लागून मृत्यू झाल्याची अफवा पसरली होती. चित्रपटाच्या निर्मात्यांनी प्रसिद्धीसाठी ही अफवा पसरवल्याचे नंतर समोर आले.

१९९५ मध्ये ‘रघुवीर’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान अभिनेत्री शिल्पा शिरोडकरचा गोळी लागून मृत्यू झाल्याची अफवा पसरली होती, त्यामुळे तिच्या कुटुंबीयांमध्ये आणि चाहत्यांमध्ये खळबळ उडाली. या चित्रपटात शिल्पा शिरोडकरसोबत सुनील शेट्टी, सुरेश ओबेरॉय, सुधा चंद्रन, मोहनीश बहल, अरुणा इराणी, गुलशन ग्रोव्हर आणि प्रेम चोप्रा यांच्याही भूमिका होत्या.

मृत्यूची पसरवली अफवा

१९९५ मध्ये 'रघुवीर' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अभिनेत्री शिल्पा शिरोडकरच्या मृत्यूची अफवा अचानक पसरली . अलीकडेच बोलताना शिल्पा शिरोडकरने या विचित्र अनुभवाबद्दल सांगितले. ती म्हणाली की ती त्या वेळी कुल्लू मनालीमध्ये शूटिंगसाठी होती आणि मोबाईल फोन नसल्यामुळे तिचे वडील हॉटेलमध्ये फोन करत होते. सुनील शेट्टीसोबत शूटिंग करत असताना आजूबाजूला उपस्थित असलेल्या लोकांना आश्चर्य वाटत होतं की, ही खरंच शिल्पा आहे का, की तिच्यासारखी दिसणारी दुसरी कोणी, कारण तेव्हा तिच्या गोळी लागून मृत्यू झाल्याची बातमी पसरली होती.

आई वडिलांनी केला अनेकवेळा फोन 

शिल्पा पुढे म्हणाली की, जेव्हा ती हॉटेलच्या खोलीत परतली तेव्हा तिच्या फोनवर २०-२५ मिस्ड कॉल्स होते. तिच्या आईवडिलांनी ती सुरक्षित आहे का याची खात्री करण्यासाठी अनेकदा फोन केला होता, कारण वर्तमानपत्रांमध्ये ‘शिल्पा शिरोडकरची गोळ्या घालून हत्या’ झाल्याची बातमी छापून आली होती. त्यामुळे तिच्या कुटुंबीयांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं.

या अफवेबाबत बोलताना शिल्पाने सांगितलं की, नंतर चित्रपटाच्या निर्मात्यांनी तिला ही अफवा चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी पसरवण्यात आल्याचं सांगितलं. तिने तेव्हा जरी ‘ठीक आहे’ असं म्हटलं असलं, तरी तिच्या मते हे जास्त झालं होत. मात्र चित्रपट चांगला चालल्यामुळे ती फारशी नाराज झाली नाही, असं तिने स्पष्ट केलं. चित्रपटाची प्रसिद्धी करण्यासाठी ही पद्धत वापरण्यात आल्याचं यावेळी सांगण्यात आलं.