- Home
- Entertainment
- The Girlfriend vs Haq Day 1 Box Office Collection : रश्मिका की यामी, पहिल्या दिवशी किती केली कमाई?
The Girlfriend vs Haq Day 1 Box Office Collection : रश्मिका की यामी, पहिल्या दिवशी किती केली कमाई?
The Girlfriend vs Haq Day 1 Box Office Collection : शुक्रवारी दोन बहुचर्चित चित्रपट रिलीज झाले. यात रश्मिका मंदानाचा तेलुगू रोमँटिक ड्रामा 'द गर्लफ्रेंड' पॅन इंडिया स्तरावर रिलीज झाला, तर यामी गौतमचा सोशल ड्रामा 'हक' हिंदीत रिलीज झाला आहे.

'द गर्लफ्रेंड'ची पहिल्या दिवशीची कमाई किती?
राहुल रवींद्रन दिग्दर्शित 'द गर्लफ्रेंड' तेलुगूसोबतच हिंदी, तमिळ, कन्नड आणि मल्याळम भाषांमध्येही रिलीज झाला आहे. ट्रेड रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटाने पहिल्या दिवशी भारतात सुमारे १.३ कोटी रुपयांची कमाई केली आहे.
'हक'चं पहिल्या दिवसाचं कलेक्शन किती?
सुपर्ण वर्माने 'हक'चं दिग्दर्शन केलं असून हा चित्रपट फक्त हिंदीत रिलीज झाला आहे. या चित्रपटाने भारतात पहिल्या दिवशी जवळपास १.६५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. सुरुवात हळू असली तरी ओपनिंगमध्ये हा चित्रपट 'द गर्लफ्रेंड'वर भारी पडला आहे.
'द गर्लफ्रेंड'च्या स्टार कास्टमध्ये कोण-कोण आहे?
'द गर्लफ्रेंड'मध्ये रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत आहे. तिच्यासोबत दीक्षित शेट्टी दिसत आहे. त्यांच्याशिवाय अनु एमानुएल, रोहिणी आणि राव रमेश या कलाकारांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.
'हक' चित्रपटाची स्टार कास्ट
'हक'मध्ये यामी गौतम मुख्य भूमिकेत आहे. तिच्यासोबत इमरान हाश्मी दिसत आहे. त्यांच्याशिवाय शीबा चड्ढा, असीम हट्टंगडी, दानिश हुसैन, राहुल मित्रा आणि वर्तिका सिंग या कलाकारांनीही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.
काय आहे रश्मिकाच्या 'द गर्लफ्रेंड'ची कहाणी?
'द गर्लफ्रेंड'ची कथा कॉलेजमधील प्रेम आणि नात्यांवर आधारित आहे. रश्मिका मंदानाने यात एका कॉलेज तरुणीची भूमिका साकारली आहे, जी आपल्या नात्यात अनेक अडचणींचा सामना करते.
यामी गौतमच्या 'हक' चित्रपटाची कहाणी काय आहे?
'हक'ची कथा सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निर्णयावर आधारित आहे. यात यामी गौतमने शाझिया बानोची भूमिका साकारली आहे, जी पती सोडून गेल्यानंतर आपल्या हक्कांसाठी कोर्टात लढते.

