२०१८ च्या Me Too चळवळीदरम्यान आवाज उठवल्यापासून तनुश्री दत्ता हिला खूप त्रास दिला जात असल्याचं तिने व्हिडीओमध्ये सांगितलं आहे. तिला स्वतःच्या घरात त्रास दिला जात असल्याचे सांगत तिने मदतीची मागणी केली आहे.

बॉलिवूडच्या पडद्यामागे कधी काय घडेल सांगता येत नाही. तनुश्री दत्ता या बॉलिवूडच्या अभिनेत्रीने एका दिग्गज अभिनेत्याचे नाव घेऊन त्याच्यावर आरोप केले होते. पण सध्या तीच एका वाईट काळातून जात असल्याचं दिसून आलं आहे. तिचा एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये ती ढसाढसा रडत असल्याचं पाहायला मिळत आहे.

2018 च्या Me Too चळवळीदरम्यान आवाज उठवल्यापासून तिला खूप त्रास दिला जात असल्याचं तनुश्रीनं व्हिडीओमध्ये सांगितलं आहे. कंटाळून तिनं पोलिसांकडे तक्रार दाखल करण्याबाबत सांगितलं आणि मदतीची मागणी केली. अभिनेत्रीने इंस्टाग्रामवर तिचा स्वतःचा व्हिडीओ शेअर केला असून यामध्ये स्वतःच्या भावना मांडल्या आहेत.

View post on Instagram

व्हिडिओमध्ये तनुश्री काय म्हणते? - 

"मित्रांनो, माझ्या स्वतःच्या घरात मला त्रास दिला जातोय. माझ्या स्वतःच्या घरात मला त्रास दिला जातोय. मी नुकताच पोलिसांना फोन केलाय, मी निराशेतून पोलिसांना फोन केला आणि पोलीस आले. त्यांनी मला पोलीस स्टेशनमध्ये बोलावलंय, जेणेकरून मी योग्यरित्या तक्रार दाखल करू शकेन. कदाचित मी उद्या तिथे जाईन कारण माझी तब्येत ठीक नाही." असं तनुश्री दत्त हिने म्हटलं आहे.

मी स्वतःच्याच घरात अडचणीत सापडले 

"मला एवढा त्रास देण्यात आलाय, गेल्या 4-5 वर्षांत की, माझी तब्येत बिघडली आहे. मी काहीच काम करू शकत नाहीये, माझं संपूर्ण कुटुंब बरबाद झालंय, मी हाऊस हेल्परही ठेवू शकत नाही... त्या लोकांनी माझ्या घरात एक हाऊस हेल्पर ठेवलेली, तिच्यामुळे मला अत्यंत वाईट अनुभव आलाय. यायचं आणि चोरी करुन निघून जायचं... मला सर्व कामं स्वतःच करावी लागतायत... मी माझ्याच घरात खूपच अडचणींमध्ये सापडली आहे... प्लीज कुणीतरी माझी मदत करा..."

कोणीतरी माझी मदत करा 

"मी या छळाला कंटाळलेय. 2018 च्या 'Me Too' पासून हे सुरू आहे. आज, कंटाळून मी पोलिसांना फोन केला. कृपया कोणीतरी मला मदत करा. खूप उशीर होण्यापूर्वी काहीतरी करा." असं तनुश्री दत्त हिने म्हटलं आहे. तिने नाना पाटेकर यांच्यावर गंभीर आरोप केले होते पण नंतर पोलिसांना त्यांच्या विरोधात कोणतेही पुरावे मिळाले नाहीत.