प्रसिद्ध विनोदी अभिनेता सुनील ग्रोवर यांनी छोट्या गावातून मुंबईपर्यंतचा मोठा प्रवास केला आहे. सुरुवातीला महिन्याला फक्त ₹500 कमवणाऱ्या सुनील आज कोट्यवधींचे मालक आहेत. त्यांची यशोगाथा अनेकांसाठी प्रेरणादायक आहे.
प्रसिद्ध विनोदी अभिनेता सुनील ग्रोवर यांचा आज वाढदिवस आहे. त्यांनी आपल्या मेहनतीने आणि चिकाटीने छोट्या गावातून मुंबईपर्यंतचा मोठा प्रवास केला. सुरुवातीच्या काळात ते महिन्याला फक्त ₹500 कमवत होते. त्यावेळी परिस्थिती खूप कठीण होती, पण त्यांनी कधीही हार मानली नाही.
अभिनयाची सुरुवात, पहिलं व्यासपीठ मिळालं
सुनील यांनी करिअरची सुरुवात नाटकांतून केली. प्रसिद्ध कलाकार जसपाल भट्टी यांनी त्यांना संधी दिली आणि त्याच वेळी सुनील यांना स्वतःमधील कलागुण समजले. लहान भूमिका करत करत त्यांनी हळूहळू टीव्ही क्षेत्रात आपलं स्थान निर्माण केलं. 'कॉमेडी नाईट्स विथ कपिल' या शोमध्ये ‘गुथी’ हे पात्र आणि नंतर ‘द कपिल शर्मा शो’मधील ‘डॉ. मशूर गुलाटी’ यांनी सुनील ग्रोवर यांना प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. हे दोन्ही पात्र प्रेक्षकांच्या मनात घर करून बसले.
चित्रपट आणि वेब सिरीजमधील कामगिरी
फक्त विनोदी भूमिका नाही, तर सुनील यांनी काही चित्रपट आणि वेब सिरीजमध्ये गंभीर भूमिकाही साकारल्या आहेत. त्यांच्या अभिनयातील विविधतेमुळे त्यांची मागणी वाढली आहे. 'भारत', 'गब्बर इज बॅक', 'तंदूर' अशा अनेक प्रोजेक्टमध्ये ते झळकले आहेत. आजचा यशस्वी कलाकार आज सुनील ग्रोवर यांच्याकडे अंदाजे ₹21 कोटींची संपत्ती आहे. त्यांनी टीव्ही, सिनेमा, जाहिराती आणि स्टेज शोमधून मोठं यश मिळवलं आहे. एकेकाळी जे महिन्याला ₹500 मिळवत होते, ते आज कोट्यवधींचे मालक आहेत.
संघर्षातून यशाकडे वाटचाल
सुनील ग्रोवर यांची कहाणी अनेकांसाठी प्रेरणादायक आहे. त्यांनी सिद्ध केलं की, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. आज ते केवळ एक अभिनेता नाही, तर लाखोंच्या मनात आदर्श ठरले आहेत.
