कन्नड अभिनेत्री रान्या रावला बंगळुरू विमानतळावरुन 14.8 किलो सोन्याची तस्करी करण्याच्या आरोपाखाली अटक केली होता. अशातच आता अभिनेत्रीला एका वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली असून जामिनाचा अधिकार मिळणार नाही असेही कोर्टाने स्पष्ट केले आहे.
मुंबई : कन्नड चित्रपटसृष्टीत काम केलेली पण तुलनेत कमी प्रसिद्ध असलेली अभिनेत्री रान्या राव सध्या एका गंभीर गुन्ह्यामुळे चर्चेत आहे. १० मार्च रोजी बंगळुरू विमानतळावरून महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) तिला अटक केली होती. तिच्यावर १४.८ किलो सोन्याची तस्करी केल्याचा आरोप आहे, ज्याची किंमत जवळपास १२.५६ कोटी रुपये आहे.
या प्रकरणात आता मोठा निर्णय आला असून COFEPOSA (परकीय चलन संवर्धन व तस्करी प्रतिबंधक कायदा) सल्लागार मंडळाने रान्याला १ वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. विशेष म्हणजे, या शिक्षेदरम्यान तिला जामिनासाठी अर्ज करण्याचाही अधिकार नाकारण्यात आला आहे**, म्हणजेच आता संपूर्ण वर्ष ती तुरुंगातच राहणार आहे.
रान्या राव हिचं खरं नाव हर्षवर्धन रान्या असून ती कर्नाटकचे माजी पोलिस महासंचालक के. टी. रामचंद्र राव यांची सावत्र मुलगी आहे. तिच्यासह तरुण राजू नावाचा दुसराही आरोपी आहे. हे दोघं दुबईहून भारतात सोने तस्करी करत असल्याचं तपासात उघड झालं आहे. एवढंच नव्हे तर रान्याने २०२३ ते २०२५ दरम्यान तब्बल ३४ वेळा दुबईला प्रवास केल्याची नोंद आहे.
रान्याच्या निवासस्थानी २.०६ कोटी रुपयांचे दागिने आणि २.६७ कोटींची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. सुरुवातीला DRI वेळेत आरोपपत्र सादर करण्यात अयशस्वी ठरल्यामुळे तिला आणि सह-आरोपीला जामीन मिळाला होता. पण २२ एप्रिल रोजी COFEPOSA अंतर्गत अटक आदेश जारी झाल्याने जामिनाचा मार्ग बंद झाला.
रान्याने 'माणिक्य'सारख्या कन्नड हिट चित्रपटात काम केलेलं आहे, पण आता तिचं करिअर आणि वैयक्तिक आयुष्य दोन्ही मोठ्या संकटात सापडलं आहे. तिच्या वकिलांनी DRI कडून कागदपत्रांमध्ये छेडछाड झाल्याचा आरोप केला असून गुन्ह्यांमध्ये तडजोड होऊ शकते, असं म्हटलं आहे. मात्र सध्या तरी रान्या रावला या प्रकरणातून लवकरच सुटका मिळण्याची शक्यता फारच कमी आहे. @918459683863 sir check


