लग्नाच्या सात दिवसानंतर सोनाक्षी सिन्हाने दाखवले खरे रंग, पती जहीरसोबतचा व्हिडीओ व्हायरल

| Published : Jul 01 2024, 11:12 AM IST / Updated: Jul 01 2024, 11:13 AM IST

roshni

सार

Sonakshi- Zaheer : सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बाल यांचे लग्न होऊन एक आठवडा उलटला आहे. यादरम्यान, कपल सातत्याने कोणत्या ना कोणत्या कारणावरुन चर्चेत आले आहेत. अशातच सोनाक्षी आणि जहीरचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

Sonakshi- Zaheer Viral Video : बॉलिवूडमधील दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बालने 23 जूनला लग्नगाठ बांधली. लग्नाआधी आणि नंतरही कपल सध्या चर्चेत आहेत. याशिवाय सोनाक्षी आणि जहीरने लग्नाचे काही फोटो देखील सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. अशातच कपलचा एक व्हिडीओ सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सोनाक्षीने पती जहीरसोबत केलेल्या वागणुकीमुळे सर्वजण हैराण झाले आहेत.

काय आहे व्हिडीओमध्ये?
नवविवाहित कपल सोनाक्षी आणि जहीर फिरण्यासाठी बाहेर गेले होते. कपल एका मॉलमध्ये फिरताना दिसून येत आहेत. याचा व्हिडीओ अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने इंस्टाग्रामवर स्टोरीजमध्ये शेअर केला आहे. यामध्ये सोनाक्षीने बेज कलरमधील आउटफिट तर जहीरने बिग साइज शर्ट आणि पँट घातली आहे.

व्हिडीओच्या सुरुवातीला सोनाक्षीने फुटवेअर न घातल्याची झलक दाखवत कॅमेरा जहीरच्या दिशेने फिरवला आहे. यावेळी जहीरच्या हातात सोनाक्षीच्या फुटवेअर असल्याचे दिसून येत आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. पोस्ट व्हिडीओला क्युट कॅप्शन लिहित सोनाक्षीने म्हटेल की, "जेव्हा तुम्ही ग्रीन फ्लॅग मुलाशी लग्ना करता."

जहीरने दिली अशी प्रतिक्रिया
सोनाक्षीच्या पोस्टवर जहीरने प्रतिक्रिया देत म्हटले की, "I Love You Baby". हाच व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून कपलला पाहून चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

जहीर आणि सोनाक्षीचे रिलेशनशिप
सोनाक्षी सिन्हाने 23 जूनला जहीर इक्बालसोबत लग्न केले. रजिस्टर्ड पद्धतीने लग्न केल्यानंतर कपलने ग्रँड रिसेप्शनचे आयोजन केले होते. सात वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. सध्या कपलचे लग्नसोहळ्याच्या फोटो, व्हिडीओमुळे दोघेही चर्चेत आहेत.

आणखी वाचा : 

Kalki 2898 AD Box Office : जगभरात 'कल्कि' सिनेमाचा डंका, या चार सिनेमांचा रेकॉर्ड ब्रेक करत रचला इतिहास

Shatrughan Sinha Health Update: सोनाक्षीच्या वडिलांवर होणार शस्त्रक्रिया, जाणून घ्या त्यांना रुग्णालयातून कधी मिळेल डिस्चार्ज