- Home
- Entertainment
- भाभीजी घर पर है मालिकेतून 'ही' मराठी अभिनेत्री करणार पदार्पण, माहित झाल्यावर जागेवरच माराल उड्या
भाभीजी घर पर है मालिकेतून 'ही' मराठी अभिनेत्री करणार पदार्पण, माहित झाल्यावर जागेवरच माराल उड्या
'भाभीजी घर पर है' मालिकेतून प्रसिद्ध झालेली अभिनेत्री शिल्पा शिंदे पुन्हा एकदा अंगुरी भाभीच्या भूमिकेत परतणार आहे. निर्मात्यांसोबतच्या मतभेदांमुळे तिने मालिका सोडली होती, पण आता प्रेक्षकांच्या मागणीमुळे ती नवीन पर्वातून कमबॅक करणार असल्याचे समजते.

शिल्पा शिंदे ही बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. भाभीजी घर पर है या मालिकेतून तिला प्रचंड प्रसिद्धी मिळाली. पण काही कारणाने तिने या मालिकेतून एक्झिट घेतली आहे.
खूप लोकप्रियता मिळाली
शिल्पा शिंदेने या मालिकेतून अंगुरी भाभीची भूमिका केली होती. तिचे वैचारिक मतभेद झाल्यामुळे तिने मालिकेतून एक्झिट घेतली. त्यांनतर तिच्या जागी शुभांगी अत्रे या अभिनेत्रीने काम केलं होतं.
शिल्पा शिंदे परत कमबॅक करणार
शिल्पा शिंदे ही अभिनेत्री परत कमबॅक करणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. नवीन पर्वामध्ये तिला काम भेटलं असून आता प्रेक्षकांना परत एकदा भाभीजी बघायला मिळणार असल्याचं समजत आहे.
पुन्हा एकदा अंगुरी भाभीच्या रूपात दिसणार
पुन्हा एकदा अंगुरी भाभीच्या रूपात शिल्पा शिंदे दिसून येणार आहे. आता या मालिकेचं नवीन पर्व यायला हवं अशी प्रेक्षकांनी मागणी केली होती. त्यांच्या मागणीचा मान ठेवून तो भाग आणला जाणार आहे.
चित्रीकरण कधी सुरु होणार?
या मालिकेचा नवीन सेट बनत असून ती परत एकदा लवकरच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ही मालिका डिसेंबर महिन्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तिने बिग बॉस मध्ये भाग घेतला होता.

