‘तेरी बातों में ऐसा उलझा जिया’ ओटीटीवर दाखल, नेमकी कोणत्या ओटीटी वर वाचा सविस्तर

| Published : Apr 05 2024, 05:33 PM IST / Updated: Apr 05 2024, 05:35 PM IST

 Shahid Kapoor Kriti Sanon

सार

50 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 133 कोटी रुपयांची कमाई केली होती.

 

एंटरटेनमेंट डेस्क : शाहिद कपूर आणि क्रिती सेनॉनचा ‘तेरी बातों में ऐसा उलझा जिया’ हा चित्रपट आता ओटीटी वर प्रदर्शित होणार आहे.हा चित्रपट ९ फेब्रुवारी रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती. आता जवळपास दोन महिन्यांनी हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे.

शाहिद कपूर आणि क्रिती सेनॉन यांचा ‘तेरी बातों में ऐसा उलझा जिया’ हा चित्रपट आता प्रेक्षकांना ओटीटीवर पाहता येणार आहे. या चित्रपटाला सिनेमागृहांमध्ये प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले होते. या चित्रपटाची कथा थोडी हटके असलयाने प्रेक्षकांना देखील पसंतीस पडली होती. त्यामुळे चित्रपटाने चांगली कमाई केली. रोमँटिक कॉमेडी असलेला हा चित्रपट आता ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे. 

हा चित्रपट प्राइम व्हिडीओवर प्रेक्षकांना पाहता येणार आहे.तसेच प्राइम व्हिडीओने आपल्या "एक्स" अकाउंटवर चित्रपटाचे पोस्टर शेअर करून याची माहिती दिली आहे. हा चित्रपट प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे प्रेक्षकांना पाहिजे तेव्हा चित्रपट पाहण्याची संधी प्राईम ने उपलब्ध करून दिली आहे.

या कलाकारांची चित्रपटात भूमिका :

शाहिद कपूर,क्रिती सेनन , धर्मेंद्र , डिंपल कपाडिया यांच्या मुख्य भूमिकेसह राकेश बेदी, राजेश कुमार असे कलाकार या चित्रपटात आहेत. या चित्रपटात क्रितीने रोबोटची भूमिका साकारली आहे. 50 कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्य या चित्रपटाने 133 कोटींची कमाई केली होती.

आणखी वाचा :

Navri Mile Hitlerla Previwe : घरापर्यंत पोहोचलेल्या विक्रांतला धडा शिकवण्यासाठी लीलाची हिटरल मदत करणार?

पंजाब किंग्स संघाने गोंधळात घेतलेल्या खेळाडूने सामना दिला जिंकून, शशांकचे मिम्स सोशल मीडियावर झाले व्हायरल

कतरिना कैफने नाही केले अक्षय कुमारचा 'बडे मियाँ छोटे मियाँ'मध्ये काम, जाणून घ्या कारण?