सार

अभिनेता आयुष्मान खुराना आणि अनन्या पांडे असलेल्या कॉमेडी ड्रामा चित्रपट 'ड्रीम गर्ल 2' गेल्या वर्षी रिलीज झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र चित्रपटामधील अनन्या पांडेचा अभिनय अनेक प्रेक्षकांना पसंतीस पडला नाही. 

अभिनेता आयुष्मान खुराना आणि अनन्या पांडे असलेल्या कॉमेडी ड्रामा चित्रपट 'ड्रीम गर्ल 2' गेल्या वर्षी रिलीज झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र चित्रपटामधील अनन्या पांडेचा अभिनय अनेक प्रेक्षकांना पसंतीस पडला नाही,यावरून अनेकांनी तिला ट्रेल देखील केले होते तसेच याबद्दल अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून सांगितलं होतं. आता ड्रीम गर्ल फ्रँचायझीकडून एक मोठे अपडेट समोर आली आहे. 'ड्रीम गर्ल 3' या चित्रपटावर सध्या काम सुरू झालं आहे. यावेळी या चित्रपटातून अनन्या पांडेला वगळण्यात आलं असल्याचे बोलले जात आहे. या बातमीवर निर्मात्यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.मात्र या चित्रपटात आयुष्मान सोबत सारा अली खान दिसण्याची शक्यता असल्याचे रिपोर्टनुसार म्हंटले जात आहे.

'ड्रीम गर्ल 3'मध्ये सारा अली खाननची एंट्री :

रिपोर्टनुसार या चित्रपटामध्ये सारा अली खान अनन्या पांडेची जागा घेणार आहे. ड्रीम गर्ल फ्रँचायझीच्या पहिल्या भागात अभिनेत्री नुसरत भरुचा होती. तिची जागा 'ड्रीम गर्ल 2' मध्ये अनन्या पांडेनं घेतली होती. आता 'ड्रीम गर्ल 3'मध्ये सारा अली खान झळकणार आहे. आयुष्मान आणि सारानं 'ड्रीम गर्ल 3' च्या निर्मात्यांबरोबर एक अधिकृत बैठक घेतली आहे. आता सारा ही बॉलिवूडची पुढची ड्रीम गर्ल बनणार आहे. ही बातमी समोर येताच साराचे चाहते याबद्दल खूप खुश झाले आहेत. 'ड्रीम गर्ल ' आणि 'ड्रीम गर्ल 2'नं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या निर्मात्यांना तिसऱ्या भागाकडून देखील खूप अपेक्षा आहेत.

'ड्रीम गर्ल' फ्रँचायझीबद्दल :

'ड्रीम गर्ल' हा चित्रपट 2019 साली आला होता, या चित्रपटाला प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळालं होतं. चित्रपटातील प्रत्येक पात्र खूप मजेदार असून, या चित्रपटानं प्रेक्षकांच खूप मनोरंजन केलं होत. 'ड्रीम गर्ल' चित्रपटामध्ये अन्नू कपूर हा आयुष्मान खुरानाच्या वडिलांच्या भूमिकेत दिसला होता. या चित्रपटामध्ये या दोन्ही कलाकारांचा अभिनय प्रेक्षकांना खूप आवडला होता. 25 ऑगस्ट 2023 रोजी रिलीज झालेल्या 'ड्रीम गर्ल 2' हा पाहिजे तसे यश मिळवू शकले नाही. हा चित्रपट रुपेरी पडद्यावर हिट होता, मात्र निर्मात्यांचा अपेक्षेपेक्षा यानं कमी कमाई केली. 'ड्रीम गर्ल'चं दिग्दर्शन राज शांडिल्य यांनी केलंय.