- Home
- Entertainment
- Bigg Boss 19 : लिव्हिंग एरिया, पूल ते बेडरुम, असा आहे बिग बॉसचा सेट, बघा 10 Inside Photos
Bigg Boss 19 : लिव्हिंग एरिया, पूल ते बेडरुम, असा आहे बिग बॉसचा सेट, बघा 10 Inside Photos
मुंबई - बिग बॉस १९ च्या सेटचे इन्साईड फोटो समोर आले आहेत. सलमान खानच्या शोची सुरुवात २४ ऑगस्टपासून होणार आहे. घर अगदी आलिशान दिसतंय. याच घरात हे स्पर्धक राहणार असून येथेच ते हसणार, रडणार, भांडणार आहेत.

घराची झलक
बिग बॉस १९ च्या घराचे आतले फोटो समोर आले आहेत. या घराचे डिझाईन खूपच सुंदर आहे. तुम्हाला हे फोटो मोहित करतील. याच घरात तुम्हाला सेलिब्रिटींचा तमाशा येत्या काही दिवसांत दिसून येणार आहे.
किचन एरिया
बिग बॉस १९ च्या घरातलं किचन. इथेच सगळे स्पर्धक जेवण बनवतील. जेवणावरुन या स्पर्धकांमध्ये बरेच वाद-विवाद होतात. त्यातून एकमेकांना नकोनको ते बोलतात. याच किचनमध्ये पुन्हा असे वादविवाद बघायला मिळणार आहेत.
लिविंग रूम
बिग बॉस १९ च्या घरातला लिविंग रूम. इथेच स्पर्धकांना टास्क मिळतील. त्या टास्कप्रमाणे त्यांना त्यांची वागणूक ठेवावी लागेल. त्यांच्या टास्कवर बिग बॉसचे लक्ष असेल. त्यावरुन त्यांच्या गुणवत्तेची मोजमाप केली जाईल. त्यांना इलिमिनेट केली जाईल किंवा कायम ठेवले जाईल.
लॉन एरिया
बिग बॉस १९ च्या घरातला लॉन. इथे स्पर्धक गप्पा मारतील. गप्पा मारताना कायम त्यांच्यात अनेक प्रसंग झाल्याचे दिसून आले आहेत. काही जण रोमॅन्टीक झाले तर काही प्रेमात पडले. काहींनी एकमेकांना मारहाण करेपर्यंत भांडणे केली तर काहींनी बराच तमाशा मांडला.
बेडरूम
बिग बॉस १९ च्या घरातला बेडरूम. इथे स्पर्धक विश्रांती घेतील. काही सिजनमध्ये या बेडरुमवरुन बराच वाद झाला होता. केवळ विश्रांतीच नव्हे तर काही स्पर्धकांनी जवळीक साधल्याचेही दिसून आले होते. त्यावरुन बिग बॉसवर टीकाही झाली होती.
बेडरूमची सजावट
बिग बॉस १९ च्या बेडरूमची सजावट पहा. खूपच सुंदर दिसतेय. या बेडरुमला वुडन टच देण्यात आलाय. एक बेडरुममध्ये दोन बेड आहेत. फ्लोरिंगही बुडनचे आहे. येथे विश्रांती घेऊन बिग बॉसचे स्पर्धेक पुढील टास्कसाठी सज्ज होतील.
जिम
बिग बॉस १९ च्या घरात जिमचीही सुविधा आहे. सेलिब्रिटींना व्यायामाची आवड असते. त्यामुळे या घरात एक छोटेखानी जिमही ठेवली आहे. या जिममुळे त्यांची शारीरिक तंदुरुस्ती राखली जाईल. ही जीमही अनेकदा वादात सापडली आहे.
पूल एरिया
बिग बॉस १९ च्या घरात स्विमिंग पूलचीही सुविधा आहे. या पुलच्या शेजारी बसून सेलिब्रिटी गप्पा मारतील. पाण्यात पाय सोडून बसतील. त्यामुळे नवीन जोड्या तयार होतील. हे कपल्स आणखी रोमॅन्टीक होतील.
वॉश एरिया
बिग बॉस १९ च्या घरातला वॉश एरिया पहा. खूपच सुंदर दिसतोय. येथे गोल आकाराचे आरशे लावले आहेत. त्यात सेलिब्रिटी स्वतःला बघू शकतील. हा एरियाही खून सुंदर सजवलेला आहे.
बिग बॉस १९ ची सुरुवात
सलमान खानचा शो बिग बॉस सिजन १९ हे २४ ऑगस्टपासून रात्री ९ वाजता सुरू होईल. सध्या बिग बॉसचे फॅन या शोची आतुरतेने वाट बघत आहेत.

