- Home
- Entertainment
- Saiyaara Day 10 Box Office Collection : ‘सैयारा’ने १० दिवसांत जमवला २४७ कोटींचा गल्ला, ३०० कोटींच्या दिशेने वाटचाल
Saiyaara Day 10 Box Office Collection : ‘सैयारा’ने १० दिवसांत जमवला २४७ कोटींचा गल्ला, ३०० कोटींच्या दिशेने वाटचाल
मुंबई - मोहित सुरी दिग्दर्शित आणि अहान पांडे व अनीत पड्डा यांच्या प्रमुख भूमिकेत असलेला रोमँटिक ड्रामा ‘सैयारा’ बॉक्स ऑफिसवर यशाचे उच्चांक गाठत आहे. अवघ्या १० दिवसांतच चित्रपटाने २४७.२५ कोटी रुपयांची कमाई केली असून २५० कोटींच्या दिशेने पुढे जात आहे.

‘सैयारा’चा बॉक्स ऑफिस अहवाल:
गेल्या ९ दिवसांत एकदाही कमाई दहा कोटींच्या खाली गेली नाही, ही बाब ‘सैयारा’च्या यशामागील एक महत्त्वाची गोष्ट मानली जात आहे. दुसऱ्या रविवारी (दिवस १०) चित्रपटाने अंदाजे ३० कोटी रुपये कमावले.
‘सैयारा’चा बॉक्स ऑफिस अहवाल:
पहिला आठवडा:
दिवस १ (शुक्रवार): ₹21.5 कोटी
दिवस २ (शनिवार): ₹26 कोटी
दिवस ३ (रविवार): ₹35.75 कोटी
दिवस ४ (सोमवार): ₹24 कोटी
दिवस ५ (मंगळवार): ₹25 कोटी
दिवस ६ (बुधवार): ₹21.5 कोटी
दिवस ७ (गुरुवार): ₹19 कोटी
एकूण: ₹172.75 कोटी
दुसरा आठवडा:
दिवस ८ (शुक्रवार): ₹18 कोटी
दिवस ९ (शनिवार): ₹26.5 कोटी
दिवस १० (रविवार): ₹30 कोटी (अंदाज)
सध्यापर्यंतची एकूण कमाई: ₹247.25 कोटी
चित्रपटाची कथा आणि लोकप्रियता:
‘सैयारा’ ही कृष्ण कपूर (अहान पांडे) या तरुण संगीतकाराची आणि वाणी बत्रा (अनीत पड्डा) या शांत स्वभावाच्या लेखिकेची भावनिक प्रेमकहाणी आहे. प्रेम, विरह, मनाचा संघर्ष आणि आत्मिक जोड यासारख्या भावनांना छान पद्धतीने चित्रपटात सादर करण्यात आले आहे. प्रेक्षक आणि समीक्षक दोघांनीही या कथेला भरभरून प्रतिसाद दिला आहे.
२०२५ मधील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट
सध्या ‘सैयारा’ ने अक्षय कुमारच्या ‘हाऊसफुल ५’ ला मागे टाकून २०२५ मधील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक गल्ला जमवणारा हिंदी चित्रपट बनला आहे. पहिल्या क्रमांकावर आहे विकी कौशलचा ‘छावा’, ज्याने ६०० कोटींचा आकडा पार केला आहे.
३०० कोटींच्या क्लबकडे झेप!
सुरुवातीला २०० कोटींच्याच आकड्यावर थांबेल असे वाटणारा ‘सैयारा’, आता ३०० कोटींच्या क्लबसाठी एक जबरदस्त स्पर्धक ठरत आहे. या चित्रपटाचे यश केवळ स्टार पॉवरवर नव्हे, तर चांगल्या कथानक, अभिनय आणि प्रेक्षकांच्या सकारात्मक प्रतिक्रियेमुळे आहे.
