प्रसिद्ध अभिनेत्री शुभांगी गोखले यांचे बंधू रविंद्र संगवई यांचे निधन झाले आहे. 'श्रीयुत गंगाधर टिपरे' मालिकेत त्यांनी क्षिती जोगच्या वडिलांची भूमिका साकारली होती.
मुंबई : प्रसिद्ध अभिनेत्री शुभांगी गोखले यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या भावाचा रविंद्र संगवई यांचं नुकतेच निधन झाला असून, ही बातमी स्वतः शुभांगी यांनी सोशल मीडियावर शेअर करत सर्वांशी दुःख वाटून घेतलं आहे.
'श्रीयुत गंगाधर टिपरे' मधील आठवणींनी भरलेली भूमिका
शुभांगी गोखले आणि त्यांचे बंधू रविंद्र संगवई या दोघांनी एकत्र ‘श्रीयुत गंगाधर टिपरे’ या लोकप्रिय मालिकेत काम केलं होतं. मालिकेत रविंद्र यांनी क्षिती जोगच्या वडिलांची भूमिका साकारली होती. जरी त्यांनी मोजक्या भागांमध्ये भूमिका केली, तरी ती प्रेक्षकांच्या मनात आजही घर करून आहे.
करिअर आणि व्यावसायिक जीवन
रविंद्र संगवई हे पेशाने रिझर्व्ह बँकेत एक्झिक्यूटिव्ह चीफ मॅनेजर म्हणून कार्यरत होते. याशिवाय त्यांनी काही काळ सिम्बॉयसिस कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणूनही जबाबदारी सांभाळली. अभिनयाच्या क्षेत्रात त्यांनी फारसं वेळ न घालवला नसला, तरी ‘गंगाधर टिपरे’मधील त्यांचा अभिनय अजूनही स्मरणात राहील असाच आहे.
भावपूर्ण निरोप शुभांगी गोखले यांनी आपल्या पोस्टमध्ये भावाला श्रद्धांजली अर्पण करत लिहिलं – "बालपण संपलं माझं... रविदादा, खूप एकटं पाडून गेलास." या भावनिक शब्दांनी अनेकांच्या डोळ्यांत पाणी आलं. मराठी रंगभूमी आणि दूरदर्शन क्षेत्रातील अनेक कलाकारांनी रविंद्र संगवई यांना श्रद्धांजली वाहिली असून शुभांगी यांना या कठीण प्रसंगी आधार देण्याचा प्रयत्न केला आहे.
शुभांगी गोखले यांचा वर्कफ्रंट
सध्या शुभांगी गोखले ‘असेन मी नसेन मी’ या नाटकात काम करत आहेत. या नाटकात त्यांच्यासोबत अमृता सुभाष आणि नीना कुलकर्णी यांसारख्या दिग्गज अभिनेत्रींचा सहभाग आहे. स्मरणात राहील अशी व्यक्तिरेखा आणि प्रभावी अभिनयाने भारलेला प्रवास रविंद्र संगवई यांचं आयुष्य आणि त्यांचा अभिनय कायम मराठी चाहत्यांच्या मनात राहणार आहे.


